सॅमसंग Galaxy S21 FE 5G भारतात सादर : 120Hz डिस्प्ले, प्रो कॅमेरा!

काही दिवसांपूर्वी CES 2022 मध्ये जाहीर करण्यात आलेला सॅमसंग Galaxy S21 FE 5G आज भारतात सादर करण्यात आला असून यामध्ये Exynos 2100 प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्लोबल आवृत्ती मध्ये मात्र Snapdragon 888 प्रोसेसर होता. या फोनची किंमत भारतात ५४९९९ इतकी ठेवण्यात आली आहे.

या फोनमध्ये 6.4″ FHD+ Dynamic 2X AMOLED डिस्प्ले मिळेल ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz असणार आहे. कॅमेरासाठी 12MP Main + 12MP Ultrawide + 8MP Telephoto असून फ्रंट कॅमेरा 32MP चा आहे. या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी आणि 25W चं फास्ट चार्जिंग देण्यात आलं आहे. IP68 water आणि dust resistance, USB Type-C पोर्ट, wireless DeX, इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर अशा सोयी आहेत

हा फोनवर लॉंच ऑफर देण्यात येत असून या अंतर्गत HDFC बँक कार्ड वापरल्यास ५००० रु कॅशबॅक मिळेल. यामुळे याची किंमत ४९९९९ पर्यंत येईल. ही ऑफर १७ जानेवारी पर्यंत उपलब्ध आहे. शिवाय प्रि बुकिंग केलेल्या ग्राहकांना २६९९ किंमतीचे Samsung SmartTag मोफत मिळणार आहेत.

सॅमसंगची ही फॅन एडिशन मधील फोन्सची मालिका त्यांच्या जास्त किंमतीच्या S21 Ultra, S21 मधील बऱ्याचशा सोयी कमी किंमतीत उपलब्ध करून देते. S20 FE 5G सुद्धा बराच लोकप्रिय ठरला होता.

डिस्प्ले : 6.4″ FHD+ Dynamic 2X AMOLED Display 120Hz
प्रोसेसर : Samsung Exynos 2100
रॅम : 8GB
स्टोरेज : 128GB/256GB
कॅमेरा : 12MP Quad Camera + 12MP Ultrawide + 8MP Telephoto
फ्रंट कॅमेरा : 32MP
बॅटरी : 4500mAh 25W
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 12 with One UI 4
इतर : NFC, Type C Port, in-display fingerprint sensor
नेटवर्क : 5G, 4G
रंग : Awesome Violet, Awesome Black, Awesome White
किंमत :
8GB+128GB ₹ ५४९९९
8GB+256GB ₹ ५८९९९

https://youtu.be/ZdhN8CpNn0Y
Exit mobile version