१९९० मध्ये लॉंच झालेल्या हबल टेलिस्कोपनंतर त्यापेक्षा १०० पट अधिक पॉवरफुल असलेला जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपचं काल प्रक्षेपण झालं असून याचं वजन तब्बल ७ टन इतकं आहे! आजवर हबल टेलिस्कोपला ज्या गोष्टी पाहणं शक्य नव्हतं त्या या टेलिस्कोपद्वारे शक्य होतील आणि आपल्याला तुलनेने अधिक अंतरावरील दृश्यं सुस्पष्टरित्या दिसतील. अगदी ज्यावेळी विश्वाची निर्मिती झाली तेव्हाच्या आकाशगंगा (Galaxy) तयार झाल्या आणि त्यावेळच्या घडामोडींचाही अभ्यास याद्वारे शक्य होणार आहे.
दक्षिण अमेरिकेतील फ्रेंच गियाना येथून Ariane flight VA256 रॉकेटद्वारे हा टेलिस्कोप अवकाशात झेपावला. नासाच्या यूट्यूब चॅनलवर याचा व्हिडिओ पाहू शकता.
या मोहिमेसाठी जवळपास १० बिलियन डॉलर्स खर्च झाला असून ही आजवरची सर्वात महाग मोहीम असणार आहे! ६.५ मित्र विस्तीर्ण आरशाचा यामध्ये समावेश आहे! गोल्ड प्लेटेड असलेल्या या आरशाला नेहमी उपयुक्त जागी ठेवण्यासाठी १८ मोटर्स जोडलेल्या भागांचा वापर करण्यात आला आहे. हा टेलिस्कोप 13.6 billion प्रकाशवर्षांपूर्वीच्या इन्फ्रारेड लाइटला टिपू शकेल हा काळ म्हणजे वैज्ञानिकांच्या अंदाजाने 13.8 billion वर्षांपूर्वी घडलेल्या बिग बँगच्या घटनेनंतरचा काळ दर्शवू शकेल!
जेम्स वेब (James Webb) या १९६० च्या दशकात त्यांनी नासाच्या महत्वाच्या मोहिमांची धुरा सांभाळली होती. त्यांच्या सन्मानार्थ या नेक्स्ट जनरेशन स्पेस टेलिस्कोपचं नाव जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप असं देण्यात आलं आहे.
या टेलिस्कोपला पृथ्वी ते चंद्राच्या चारपट अंतर दूर अपेक्षित जागी पोहोचण्यासाठी जवळपास १ महिना लागेल. सुरवातीला चाचण्या पार पडल्यावर जून महिन्यात हा पूर्णपणे कार्यान्वित होईल. सध्याचा टप्पा यशस्वी झालेला असला तरी अजूनही बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्यामुळे हे मोहीम अपयशी ठरू शकते. या टेलिस्कोपच्या खास ट्विटर हॅंडलवर (twitter.com/NASAWebb) याची सध्याची माहिती व स्थिती पाहू शकता.