ट्विटर सीईओ जॅक डॉर्सी यांचा राजीनामा : पराग अग्रवाल नवे सीईओ!

Twitter New CEO Parag

ट्विटर या प्रसिद्ध मायक्रो ब्लॉगिंग सोशल मीडिया वेबसाइटचे सह संस्थापक आणि सीईओ जॅक डॉर्सी यांना आज राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं असून त्यांची जागा ट्विटरमध्ये सध्या CTO असलेले पराग अग्रवाल घेणार आहेत. पराग अग्रवाल हे मुंबई आयआयटीचे माजी विद्यार्थी आहेत.

सत्या नाडेला (मायक्रोसॉफ्ट), सुंदर पिचाई (गूगल), शंतनू नारायण (अडोबी),राजीव सुरी (नोकिया), अरविंद कृष्णा (आयबीएम), अजयपाल बंगा (मास्टरकार्ड), इ. यांच्यासारख्या मूळच्या भारतीय पण आघाडीच्या अमेरिकन कंपनीमध्ये प्रमुख पदावर असलेल्या उदाहरणानंतर आता पराग हे ट्विटरचे नवे सीईओ बनतील!

ADVERTISEMENT
Exit mobile version