Grand Theft Auto म्हणजे GTA गेम मालिका म्हणजे आजवरच्या सर्वात लोकप्रिय गेम्समधील आघाडीचं नाव. या गेम मालिकेतील Grand Theft Auto III, Grand Theft Auto Vice City आणि Grand Theft Auto San Andreas या गेम्सच्या Trilogy Definitive Edition रॉकस्टार गेम्स तर्फे जाहीर करण्यात आली असून ही Xbox, PlayStation, Nintendo Switch, PC आणि iOS व अँड्रॉइडवर सुद्धा २०२२ मध्ये उपलब्ध होणार आहे!
यापैकी GTA III गेमला यावर्षी ऑक्टोबर महिन्यात २० वर्षं पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने ही Definitive Edition आणण्यात येत आहे. या नव्याने येणाऱ्या गेम्समध्ये नव्या गेमिंग कॉन्सोल्स व पीसीला साजेसं ग्राफिक्स आणि गेमप्लेमधील बदल पहायला मिळतील. क्लासिक लूक आणि फील मात्र आहे असाच ठेवण्यात येणार आहे.
भारतात सुद्धा अजूनही GTA Vice City, San Andreas प्रचंड लोकप्रिय गेम आहेत. आत्ता नवीन लॅपटॉप्स व गेमिंग पीसीची वाढलेल्या वापरामुळे GTA V गेम खेळली जात असली तरी नव्या रूपात येणाऱ्या या गेम्सकडेही गेमर्स नक्कीच वळतील. GTA V नंतर नवीन GTA VI कधी येणार याची मात्र अजूनही काहीच माहिती देण्यात आलेली नाही. २०१३ मध्ये आलेल्या या गेमच्या पुढच्या आवृत्तीसाठी गेमर्सना आणखी बरीच वर्षं वाट पहावी लागणार असं दिसत आहे.