टेलिग्राम या लोकप्रिय मेसेजिंग ॲपमध्ये काही दिवसांपूर्वी नवं अपडेट आलं असून यामध्ये अनेक नव्या सोयी जोडण्यात आल्या आहेत. टेलिग्राममध्ये आता व्हिडिओ कॉल तब्बल १००० लोक पाहू शकणार आहेत. यासोबत व्हिडिओ मेसेजेस अधिक चांगल्या गुणवत्तेचे असतील. व्हिडिओ पाहताना 0.5x किंवा 2x असे पर्याय असतील ज्यामुळे व्हिडिओ आपल्याला कमी किंवा अधिक वेगात पाहता येतील.
Group Video Calls 2.0 : नव्या व्हिडिओ कॉल्समध्ये आता ३० यूजर्स त्यांचा कॅमेरा व्हिडिओ किंवा स्क्रीन ब्रॉडकास्ट करू शकतील आणि १००० लोक हा ग्रुप व्हिडिओ कॉल पाहू शकतील! येत्या काळात अमर्याद लोकाना (म्हणजे थोडक्यात स्ट्रीम प्रमाणे) व्हिडिओ कॉल पाहता येईल अशीही सोय आणत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे!
Video Messages 2.0 : व्हिडिओ मेसेजेस आता अधिक जास्त रेजोल्यूशन मध्ये असतील. एखाद्या मेसेज वर टॅप केल्यावर अधिक मोठ्या स्वरूपात दिसेल आणि तिथे fast forward किंवा rewind चाही पर्याय असेल.
Video Playback Speed : मीडिया प्लेयरमध्ये प्लेबॅक स्पीड नियंत्रित करता येईल. यामध्ये आता 0.2x, 0.5x, 1.5x आणि 2x असे पर्याय मिळतील.
Timestamp Links : व्हिडिओमधील नेमक्या सेकंदाचा टाइम caption मध्ये लिहिल्यास त्या सेकंदावर जाता येतं. आता या टाइमस्टॅम्पलाच दुसऱ्या चॅटमध्ये लिंकद्वारे शेयर करता येईल.
Screen Sharing With Sound : १ टू १ मध्येही आता स्क्रीन शेयरिंग उपलब्ध झालं आहे शिवाय यामध्ये आता डिव्हाईसमधील आवाजसुद्धा ब्रॉडकास्ट होईल.
Precision Drawing : मीडिया एडिटरमध्ये आता झुम करून एडिट करता येईल ज्यामुळे चुका होणार नाहीत आणि अचूक जागीच मजकूर किंवा ब्रश एडिट करता येईल.
यासोबत नेहमीप्रमाणे नव्या ॲनिमेटेड इमोजीसुद्धा आलेल्या आहेतच
या निमित्ताने आमच्यातर्फेही एक नवी बातमी आहे ती म्हणजे आम्हीही लवकरच टेलिग्रामवर येत आहोत…!