ट्विटरवर आता मोठ्या इमेजेस क्रॉप न होता पूर्ण दिसणार!

TwitterNoCrop

आजवर ट्विटरवर सर्व इमेजेस ठराविक आकारातच दिसायच्या. त्यांना पूर्ण पाहण्यासाठी त्यावर क्लिक करून मग पाहावं लागायचं. त्याऐवजी आता ट्विट फीडमध्ये स्क्रोल करत असतानाच पूर्ण इमेज दिसणार आहे!

ट्विटर अँड्रॉइड आणि iOS वर आता इमेजेस स्टँडर्ड रेशो (उदा. 16:9, 4:3) मध्ये असतील तर त्या सुद्धा आहे त्या स्वरूपात पूर्ण दिसतील. ट्विटर डेस्कटॉपवर अद्याप हा बदल झालेला दिसत नाही. पूर्वी इमेजमधील कोणत्याही भागात क्रॉप होऊन इमेजेस दिसायच्या. कधी कधी यामुळे गैरसमज होऊन वाद झाल्याचेही प्रकार घडले आहेत.

ट्विटरच्या या नव्या सोयीमध्ये आपल्याला इमेज अपलोड करत असतानाच preview सुद्धा दिसेल. आता आपोआप क्रॉप होण्याऐवजी आपल्याला माहिती देऊन क्रॉप निवडता येणार आहे. जर रेशो स्टँडर्ड असेल तर क्रॉप न करतासुद्धा इमेजेस दिसतील.

या बदलामुळे अनेक फोटोग्राफर्स, आर्टिस्ट, कार्टूनिस्ट यांना त्यांची कला दाखवण्यासाठी आणखी चांगला प्लॅटफॉर्म मिळणार आहे.

खाली दिलेल्या ट्विटवर जाऊन तुम्ही या नव्या बदलाचा विविध ब्रॅंडसनी केलेला सदुपयोग (!) पाहू शकता.

https://twitter.com/Twitter/status/1390026628957417473

Exit mobile version