पब्जी मोबाइल नव्या नावासह लवकरच भारतात परतणार असं जाहीर!

गेले अनेक महीने PUBG Mobile भारतात पुन्हा येणार येणार अशी चर्चा सुरू होती. शेवटी आज Krafton कंपनीने अधिकृतरित्या पोस्ट जाहीर करत सांगितलं आहे की PUBG Mobile आता भारतात Battlegrounds Mobile India या नावाने परत येत आहे. आज त्यांनी अधिकृत वेबसाइटसुद्धा आणली असून यावर नेमकी तारीख लिहिलेली नसली तरी Coming Soon असं दाखवण्यात येत आहे त्याअर्थी लवकरच ही बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया गेम नव्या नावाने भारतात उपलब्ध होईल.

Battlegrounds Mobile India Website : https://www.battlegroundsmobileindia.com

२ सप्टेंबर २०२० पासून चीनसोबत झालेल्या वादानंतर भारत सरकारने चीनी apps व गेम्सवर बंदी घातली होती त्यामध्ये पब्जीचाही समावेश होता. त्यानंतर त्यांनी वेगळे पर्याय वापरुन मूळ दक्षिण कोरियन कंपनीकडूनही भारतात पुन्हा येण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण अजूनपर्यंत तरी त्यांना यश आलं नव्हतं शेवटी Krafton या कंपनीने नव्या नावासह खास भारतासाठी बदल करत ही गेम भारतात आणण्याचं ठरवलं आहे.

कंपनीने भारतातील सध्याची Covid ची परिस्थिती पाहून २९ एप्रिल रोजी PM Cares Fund मध्ये १.५ कोटी रुपये दिले आहेत. Krafton ची भारतातली कंपनी PUBG India Private Limited यांच्यामार्फत हे डोनेशन करण्यात आलं होतं.

बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडियाचा लोगो

या गेमसोबत ते स्कीन्स, इ स्पोर्ट्स गेम्स, स्पर्धा, लीग्स असं सर्वकाही आणणार आहेत. पब्जीमुळे भारतात इ स्पोर्ट्स वाढण्यास नक्कीच फार मोठी मदत झाली होती. याच्या स्पर्धा किंवा यूट्यूब स्ट्रीम मार्फत अनेकांनी त्यांचं करियर उभं केलं आई आजही अनेक जण फुल टाइम गेमर्स बनले आहेत.

PUBG Mobile भारतात प्रचंड लोकप्रिय ठरली होती. मोठ्या प्रमाणात स्ट्रीम्स, गेमप्ले, स्पर्धा सुरू झाल्या होत्या. ही गेम इतकी लोकप्रिय होती की लोक फोन खरेदी करायला गेल्यावर यामध्ये पब्जी चांगली चालेल ना असं विचारून हे फोन्स घेऊ लागले. मात्र याचा काही प्रमाणात वाईट परिणाम सुद्धा झाला होताच.

PUBG Mobile बॅन झाल्यानंतर Call of Duty Mobile, FreeFire अशा गेम्स मोठ्या प्रमाणात खेळल्या जात होत्या. शिवाय काही दिवसात Apex Legends Mobile सुद्धा खास भारतात आणण्यात आली आहे.

Search Terms : PUBG Mobile India Battlegrounds Mobile India release date

Exit mobile version