गूगल फोटोजचं फ्री अनलिमिटेड बॅकअप १ जून पासून बंद होणार!

गूगलची गूगल फोटोज नावाची सेवा आहे ज्याद्वारे आपण आपल्या फोनमधील सर्वच्या सर्व फोटो कोणत्याही मर्यादेशिवाय अपलोड करून बॅकअप घेऊ शकता. ते सुद्धा पूर्णपणे मोफत आणि अनलिमिटेड! गूगलच्या या सेवेला लाभ अनेक जण त्यांच्या फोनमधील फोटोज, व्हिडिओजचा बॅकअप गूगलकडे घेण्यासाठी करतात. मात्र आता १ जून २०२१ नंतर यावर मर्यादा येणार असून यामध्ये घेतला जाणारा बॅकअपसुद्धा तुमच्या गूगल अकाऊंटसोबत मिळणाऱ्या 15GB स्टोरेजमध्येच मोजला जाणार आहे! अनेकांसाठी ही बातमी विशेष असू शकते कारण या स्टोरेजवर बरेच जण अवलंबून त्यांचे बॅकअप घेत आहेत.

जर तुमच्याकडे भरपूर फोटोज असतील आणि त्यांचा बॅकअप घेऊन ठेवायचा असेल तर आजच तो बॅकअप घेऊन ठेवा आणि तो सुद्धा नवा Gmail अकाऊंट तयार करून घ्या जेणेकरून तुमचं नेहमीचं जीमेल अकाऊंटवरील स्टोरेज कमी होणार नाही.

गूगल फोटोजमध्ये High Quality आणि Original असे दोन पर्याय आहेत. आत्ता हाय क्वालिटी पर्यायाद्वारे अपलोड केल्यास तो फोटो किंवा व्हिडिओ compress केला जातो आणि मग अशा प्रकारे आपण अनलिमिटेड अपलोड्स करत फ्री बॅकअप घेऊ शकता (आता १ जून २०२१ पर्यंतच). Original पर्यायाद्वारे अपलोड केल्यास आहे असा फोटो आहे त्या साईजमध्ये अपलोड होतो त्यामुळे हा फोटो गूगल अकाऊंटच्या 15GB मध्ये मोजला जाईल.

गूगल हा निर्णय पुढे ढकलण्याची शक्यता सध्यातरी दिसत नाही कारण त्यांनी हा निर्णय नोव्हेंबर २०२० पासून सर्व यूजर्सना वारंवार कळवला आहेच.

photos.google.com/storage या लिंकवर तुम्हाला तुमच्या गूगल अकाउंटमधील स्टोरेज कशा प्रकारे वापरण्यात आलं आहे ते समजेल.

गूगल अकाऊंटसोबतचं मोफत 15GB स्टोरेज जीमेल, गूगल ड्राइव आणि आता गूगल फोटोज यांना एकत्र करणारं असेल. त्यामुळे जर तुमचा जीमेल अटॅचमेंटचा वापर जास्त असेल किंवा गूगल ड्राइव तुम्ही बऱ्याच फाइल्स ठेवल्या असतील तर गूगल फोटोजचं साठी नक्कीच जागा पुरणारी नाही. गूगलच्या म्हणण्यानुसार अनेकांची ही 15GB स्टोरेजची मर्यादा पूर्ण होत नाही म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

तुम्ही अजूनही १ जून २०२१ पर्यंत मोफत अनलिमिटेड बॅकअप घेऊ शकता. १ जून २०२१ नंतर त्यामधील डेटा डिलिट होणार नाही.

Google One चे सध्याचे प्लॅन्स

जून २०२१ नंतर अपलोड करताना जर तुमचं 15GB गूगल अकाऊंट स्टोरेज भरलं तर तुम्हाला पैसे देऊन Google One चं सदस्यत्व (Subscription) घ्यावं लागेल. ज्यानंतर तुम्हाला 15GB वर 100GB अधिकचं स्टोरेज मिळेल. गूगल वन ही गूगलची क्लाऊड स्टोरेज सेवा आहे. यामध्ये प्लॅन्सनुसार अधिक स्टोरेजसुद्धा घेता येईल. गूगल वनमध्ये स्टोरेजसोबत इतरही अनेक सोयी मिळतात.

Google One Plans : https://one.google.com/about/plans

खरं सांगायचं तर गूगल फोटोजची ही अनलिमिटेड फ्री बॅकअपची सोय लवकर विश्वास बसणार नाही इतकी चांगली ऑफर होती. हे पुढे कधीतरी बंद होणार हे साहजिकच होतं. आता स्टोरेजची मागणी वाढत जात आहे हे पाहून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. शिवाय ही नवी मर्यादा सुरू होईल तेव्हा ते एक टुल देणार आहेत ज्याद्वारे ब्लर झालेले फोटो काढून टाकता येतील जेणेकरून आपलं स्टोरेज काही प्रमाणात मोकळं होईल.

जर तुम्हाला अजूनही तुमच्याकडील सर्व फोटोज मोफत ऑनलाइन बॅकअप घेऊन ठेवायचे आहेत तर १ जून २०२१ च्या आत घेऊन ठेवा

गूगलच्या फोटोज व ड्राइव्हची सेवा तुम्ही पैसे देऊन सुद्धा चांगलीच आहे कारण त्यामध्ये येणारया सुविधा आणि ऑनलाइन बॅकअप सेवा निश्चितच इतरांपेक्षा सरस आहेत. मात्र तरीही गूगल फोटोजला पर्याय शोधत असाल तर खालील काही पर्याय उपलब्ध आहेत

Amazon Photos : जर तुमच्याकडे Amazon Prime सेवा असेल तर तुम्ही बॅकअपसाठी अनलिमिटेड स्टोरेज वापरू शकता. जर प्राइम सेवेची नोंदणी नसेल तर 5GB पर्यंत मोफत फोटो, व्हिडिओ साठवता येतील.

Microsoft OneDrive : मायक्रोसॉफ्टच्या वन ड्राइव्हमध्येही बॅकअप सेवा मिळते. यामार्फत 5GB मोफत स्टोरेज उपलब्ध करून मिळतं. त्यावर स्टोरेजसाठी पैसे द्यावे लागतील.
जर तुमच्याकडे Office 365 चं सबस्क्रिप्शन असेल तर तुम्हाला त्यासोबतच 1TB स्टोरेज मोफत मिळतं.

Apple iCloud : ॲपल त्यांच्या ग्राहकांना फोटोज मार्फत 5GB मोफत स्टोरेज उपलब्ध करून देतं. मात्र हे फक्त ॲपलच्याच उपकरणांवर उपलब्ध आहे. 5GB पेक्षा अधिक iCloud स्टोरेजसाठी तुम्हाला 50GB: Rs 75, 200GB: Rs 219, 2TB: Rs 749 असे पर्याय आहेत. यामध्ये तुमचा सर्वच डेटा sync करू शकता.

Exit mobile version