आता फोर्डचा F-150 इलेक्ट्रिक ट्रक : ही गाडी घराला तीन दिवस वीज पुरवू शकते!

अलीकडे इंधनाच्या वाढत जाणाऱ्या किंमती लक्षात घेत इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे. त्यामुळे आता कंपन्या त्यांच्या प्रसिद्ध गाड्यांच्या इलेक्ट्रिक आवृत्त्या बाजारात आणत आहेत. आज फोर्डने सुद्धा त्यांच्या अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय असणाऱ्या F-150 पिकअप ट्रकची इलेक्ट्रिक आवृत्ती सादर केली आहे.

इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी फोर्डने 22 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. Ford F-150 Lightning त्यांच्या Dearborn, Michigan येथील Rouge Factory मध्ये तयार करण्यात येईल. यासोबत फोर्ड Mustang Mach E आणि एक इलेक्ट्रिक व्हॅनसुद्धा आणणार आहे.

या गाडीची किंमत 40000 डॉलर्स (~रु २९,२६,०००) पासून सुरू होत आहे. ही गाडी सध्यातरी भारतात येण्याची शक्यता नाही. टेस्ला कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मिळणारा प्रतिसाद पाहता इतर कंपन्यानी यासाठी पुढाकार घेतला हे नक्कीच चांगली होत आहे.

भारतातही अनेकजण सध्या SUV प्रकारच्या गाड्यांमध्ये इलेक्ट्रिक गाडीचा पर्याय स्वीकारताना दिसत आहेत. टाटा कंपनीची Nexon EV सध्या सर्वात लोकप्रिय म्हणता येईल. येत्या काही वर्षात भारतीय कंपन्यासुद्धा त्यांचे मिनी ट्रक, ट्रक इलेक्ट्रिक स्वरूपात आणतीलच… आता फक्त अडचण आहे ती चार्जिंग स्टेशन्सची…

https://youtu.be/GbmS-YGtzWo

Exit mobile version