ॲपलचा नवा iPad Pro आता XDR डिस्प्ले, M1 प्रोसेसर, Thunderbolt सपोर्टसह!

ॲपलने काल झालेल्या कार्यक्रमात बरीच नवी उत्पादने सादर केली असून यामध्ये iMac, iPad Pro, Apple AirTags, Apple TV ची नवी आवृत्ती यांचा समावेश आहे. आयपॅड या सर्वात लोकप्रिय आणि सर्वात उत्तम टॅब्लेटची नवी आवृत्ती सादर करण्यात आली असून यामध्ये आता नवा Liquid Retina XDR डिस्प्ले मिळेल जो प्रथमच miniLED पासून बनवण्यात आला आहे आणि याची ब्राइटनेस तब्बल 1600 nits असेल.

शिवाय मॅकबुक, आयमॅकमध्ये वापरला जाणारा M1 प्रोसेसर चक्क या टॅब्लेटमध्ये जोडण्यात आला आहे. यामुळे हा पॉवरफुल तर असेलच शिवाय याची बॅटरी लाईफसुद्धा वाढली आहे. LiDar स्कॅनर, FaceID, WiFi 6, सुपर फास्ट 5G सपोर्ट अशा सुविधा तर आहेतच. यासोबत आयपॅड प्रोला आता USB मार्फत Thunderbolt सपोर्ट देण्यात आला आहे ज्यामुळे डेटा ट्रान्सफर अनेक पटीने वेगवान होईल. हा आयपॅड प्रो आता चक्क 6K XDR आउटपुट करून मॉनिटरवर दाखवू शकेल!

कॅमेरामध्ये आता एक अल्ट्रा वाईड फ्रंट कॅमेरासुद्धा असून हा Centre Stage नावाच्या सुविधेद्वारे आपोआप तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या मध्यभागीच ठेवेल. M1 च्या Neural Engine मुळे यामधील कॅमेरा SmartHDR 3 सपोर्ट देईल.

नवा XDR डिस्प्ले फक्त 12.9″ डिस्प्ले असलेल्या मॉडेलमध्येच मिळेल. या मॉडेलमध्ये तब्बल 16GB पर्यंत रॅम आणि 2TB पर्यंत स्टोरेज पर्याय उपलब्ध आहे! याची किंमत ११ इंची मॉडेलसाठी $799 आणि १२.९” इंची मॉडेलसाठी $1099 पासून सुरू होते. अपडेट : भारतातली किंमत ११ इंची मॉडेलसाठी ₹७१,९०० पासून आणि १२.९” इंची मॉडेलसाठी ₹९९,९०० पासून सुरू होईल.

https://youtu.be/aOq49euWnIo

Exit mobile version