नासा या अमेरिकन अंतराळ संस्थेने जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांच्या Artemis प्रोग्राम अंतर्गत पुन्हा एकदा चंद्रावर मानव पाठवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये ह्युमन लँडरसाठी इलॉन मस्कच्या स्पेसएक्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. ज्यामार्फत दोन अंतराळवीर चंद्रावर नेण्यात येणार आहेत. यापैकी एक अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवणारी पहिली स्त्री अंतराळवीर ठरणार आहे. ही मोहीम २०२४ मध्ये पार पडेल.
नासा मोहिमेत रॉकेटद्वारे orion स्पेसक्राफ्ट पाठवणार आहे ह्यामध्ये ४ अंतराळवीर असतील. यामधील २ अंतराळवीर स्पेसएक्सच्या Human Landing System (HLS) मध्ये प्रवेश करतील आणि त्यांचा चंद्रावरचा प्रवास सुरू होईल ते आठवडाभर चंद्रावर अभ्यास करून उर्वरित परतीच्या प्रवासासाठी पुन्हा Orion मध्ये जाऊन पृथ्वीवर परततील.
या मोहिमेचं कंत्राट स्पेसएक्सला मिळालं आहे ते तब्बल 2.89 बिलियन डॉलर्सचं असणार आहे अशी माहिती दिलेली आहे. हे कॉंट्रॅक्ट मिळवण्यासाठी स्पेसएक्सची स्पर्धा ॲमेझॉनच्या जेफ बेझोस यांच्या Dynetics Inc कंपनी सोबत होती. स्पेसएक्सच्या अलीकडच्या मोठ्या रॉकेट्सचा अनुभव पाहता स्पेसएक्सला हे कॉंट्रॅक्ट मिळणं स्पष्टच होतं.
पृथ्वीवरून शेवटची मानवी चंद्रमोहीम यापूर्वी १९७२ मध्ये झाली होती. ज्यानंतर आजवर अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाने त्यांचे अंतराळवीर चंद्रावर पाठवलेले नाहीत!
Elon Musk’s SpaceX wins $2.9bn NASA contract to send humans to the moon