ॲपलने काल झालेल्या कार्यक्रमात बरीच नवी उत्पादने सादर केली असून यामध्ये iMac, iPad Pro, Apple AirTags, Apple TV ची नवी आवृत्ती यांचा समावेश आहे. Apple iMac 2021 हे डिस्प्लेमध्येच कम्प्युटर असलेलं उपकरण असून याची जाडी बरीच कमी करून बेझल्स (डिस्प्लेच्या कडा) आणखी कमी केल्या आहेत. शिवाय यामध्ये ॲपलचा स्वतःचा M1 प्रोसेसर देण्यात आला आहे.
नव्या आयमॅकमध्ये 24″ 4.5K Retina True Tone display असलेला डिस्प्ले आहे. यापूर्वी मॅकबुक मध्ये देण्यात आलेला M1 प्रोसेसर आता iMac मध्येही मिळेल. यामध्ये FaceTime कॅमेरा सुद्धा नवा देण्यात आला आहे ज्याचं रेजोल्यूशन 1080p असेल. M1 चीपच्या न्यूरल इंजिनमुळे व्हिडिओ गुणवत्ता सुद्धा सुधारली आहे.
अनेक वर्षानी ॲपलने आयमॅकचं डिझाईन बदललं आहे. आता हा आयमॅक तब्बल सात रंगांमध्ये उपलब्ध झाला आहे. यामध्ये 4 USB C पोर्ट्स आहेत हयापैकी 2 Thunderbolt सपोर्ट असलेले आहेत. नवा पॉवर adapter ज्याच्या बाजूला Ethernet पोर्ट आहे. यासोबत नवा मॅजिक किबोर्ड आणि मॅजिक माऊससुद्धा आणण्यात आले आहेत ज्यामध्येही सात रंगांचा पर्याय आहेच!
याची किंमत $1,299 पासून सुरू होते. अपडेट : भारतातली किंमत ₹१,१९,९०० पासून सुरू होईल.