नेटफ्लिक्सवर यावर्षी ४१ नवे टायटल्स : चित्रपट, मालिका, डॉक्युमेंटरी, इ.

नेटफ्लिक्स या लोकप्रिय स्ट्रीमिंग सेवेवर यावर्षी भारतीय यूजर्ससाठी तब्बल ४१ टायटल्स उपलब्ध होणार आहेत असं जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये विविध चित्रपट, मालिका, डॉक्युमेंटरी, कॉमेडी स्पेशल्स आणि रियालिटी शोजचा समावेश आहे. त्यांनी मार्केटिंगसाठी #AbMenuMeinSabNew नावाच्या हिंदी हॅशटॅगचा वापर सोशल मीडियावर केला आहे. २०१९ च्या तुलनेत यावर्षी दुप्पट टायटल्स उपलब्ध होत आहेत.

या प्लॅटफॉर्मवर २०२१ मध्ये १३ चित्रपट, १५ मालिका, ४ डॉक्युमेंटरी, ६ कॉमेडी स्पेशल्स आणि ३ रियालिटी शोज उपलब्ध होणार आहेत.

चित्रपट : Bulbul Tarang, Dhamaka, Haseen Dillruba, Jaadugar, Jagame Thandhiram, Meenakshi Sundareshwar, Milestone, Navarasa, Pagglait, Penthouse, Sardar Ka Grandson, The Disciple

मालिका : Aranyak, Bombay Begums, Decoupled, Delhi Crime Season 2, Feels Like Ishq, Finding Anamika, Jamtara – Sabka Number Ayega Season 2, Kota Factory Season 2, Little Things Season 4, Mai, Masaba Masaba Season 2, Mismatched Season 2, Ray, She Season 2, Yeh Kaali Kaali Ankhein

यापैकी मराठी भाषेतील एकमेव टायटल असेल ते म्हणजे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांचा द डिसायपल हा चित्रपट. आणखी मराठी चित्रपट किंवा मालिका पाहायला नक्कीच आवडलं असतं पण मराठीत OTT साठी अजूनही विशेष निर्मिती सुरू करण्यात आलेली दिसत नाही. OTT वर नव्याने उपलब्ध होणारा मराठी कंटेंट सुद्धा फारच कमी आहे.

कोरोना काळात मोठ्या संख्येने वाढलेला OTT प्रेक्षक पुढेही धरून ठेवण्याचं आव्हान नेटफ्लिक्ससमोर असणार आहे. इतर सेवांच्या तुलनेने महाग असलेल्या नेटफ्लिक्सवर येणारा कंटेंट आणि त्याची गुणवत्ताच ते आव्हान पूर्ण करू शकेल.

Exit mobile version