आधार व पॅन लिंक करण्याची मुदत पुन्हा वाढवली : नवी तारीख जून २०२१

केंद्र सरकारने काही वेळा पूर्वी जाहीर केलेल्या माहितीनुसार आधार व पॅन लिंक करण्यासाठीची मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आधार व पॅन लिंक करण्यासाठी ३१ मार्च शेवटचा दिवस असेल सांगण्यात आलं होतं मात्र आज अनेकांनी एकाचवेळी लॉगिन केल्यामुळे सरकारी वेबसाइट नेहमीप्रमाणे लोड येऊन बंद पडली. आता नवी मुदत ३० जून २०२१ पर्यंत असेल.

आता नवी मुदत मिळाली आहे तर लिंक करून घ्या. मुदतीपूर्वी लिंक केलं नाहीतर तुम्हाला १००० पर्यंत दंड भरावा लागेल शिवाय तुमचं पॅन कार्डसुद्धा बंद केलं जाईल! सरकारने इन्कम टॅक्स फाइल करतेवेळी पॅन व आधार लिंक करणं बंधनकारक केलं आहे. जर हे लिंक केलं नाही तर तुम्हाला ते बँक खातं सुरू करताना किंवा पेंशन, स्कॉलरशिप, एलपीजी सबसिडी सारख्या गोष्टींसाठी वापरता येणार नाही. लिंक करण्यासाठी यापूर्वीही अनेकवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आता COVID19 मुळे नवी मुदत देत असल्याचं सांगण्यात आलं आहे.


पॅन कार्ड आधार सोबत लिंक केलेलं आहे का कसं तपासायचं ? (Check Aadhar PAN Link Status)

यासाठी खालील लिंकवर जाऊन तुमचा पॅन क्रमांक व आधार क्रमांक टाका आणि सबमिट करा. तुम्हाला पॅन व आधार लिंक केलेलं आहे का ते लगेच समजेल.
https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/AadhaarPreloginStatus.html

अनेक जण एकाचवेळी लॉगिन करत असल्यामुळे पेज लोड होत नाही अशी एरर येत आहे.

पॅन कार्ड आधार सोबत कसं लिंक करायचं ? (How to link aadhar and PAN)

वरील वेबसाइट काम करत नसेल तर तुम्ही SMS पाठवूनही लिंक करू शकता. तुमच्या रजिस्टर केलेल्या फोनवरून 567678 किंवा 56161 वर मेसेज पाठवू शकता.

UIDAIPAN (एक स्पेस) (१२ अंकी आधार क्रमांक) (एक स्पेस) (१० अंकी पॅन क्रमांक) असा मेसेज वरील पैकी एका क्रमांकावर पाठवा.

उदा. तुमचा आधार क्रमांक ABCD12345678 हा आहे आणि पॅन क्रमांक XYZ9876543 हा आहे तर तुम्ही
UIDAIPAN ABCD12345678 XYZ9876543 असा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवायचा आहे.

Image Credits : DNA

Exit mobile version