इंस्टाग्रामकडून पालकांसाठी पॅरेंट्स गाईड : मुलांच्या सुरक्षेबद्दल माहिती

इंस्टाग्राम या सध्या सर्वात लोकप्रिय असलेल्या सोशल ॲपमार्फत अनेक तरुण तरुणी त्यांचे फोटो अपलोड करत असतात. शिवाय अनेक मित्र मैत्रिणीचे, फोटोग्राफर्स, इन्फ्लुएन्सर्सचे फोटो पाहत असतात. अशा वेळी मुलांकडून जो कंटेंट पाहिला जात आहे त्याचा त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो. सेफर इंटरनेट डेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी इंस्टाग्रामवर उपलब्ध असलेल्या पर्यायांची माहिती दिली आहे.

Instagram Parent’s Guide : https://about.instagram.com/community/parents/guide
https://about.instagram.com/community/parents

या गाईडमुळे या माध्यमाचा वापर करत असताना काळजी घेण्याविषयी पालक आणि मुलांमधील संवाद सुरू होण्यास मदत होईल! या गाईडमधील मुद्द्यांसाठी त्यांनी मुलांच्या सुरक्षेसाठी व हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थांची मदत घेण्यात आली आहे. यामध्ये Cyber Peace Foundation, Center for Social Research, Young Leaders for Activity Citizenship, Aarambh India Initiative, Suicide Prevention India Foundation आणि It’s Ok To Talk यांचा समावेश आहे.

गाईडमध्ये इंस्टाग्राममधील नवे पर्यायसुद्धा समाविष्ट करण्यात आले असून DM reachability controls पर्याय जो आपल्याला कोणते यूजर्स डायरेक्ट मेसेज करू शकतात हे नियंत्रित करता येतं.

Exit mobile version