ॲमेझॉनही भारतात वस्तु निर्मिती करणार : पहिलाच मॅन्युफॅक्चरिंग प्लांट!

ॲमेझॉनने काल जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांनी त्यांचा पहिला मॅन्युफॅक्चरिंग प्लांट भारतात चेन्नई शहरात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे! या प्लांटमध्ये दरवर्षी हजारो फायर टीव्ही स्टिकची निर्मिती करण्यात येणार आहे.

ॲमेझॉनच्या पोस्टनुसार ते फॉक्सकॉनची उपकंपनी असणाऱ्या क्लाऊड नेटवर्क टेक्नॉलॉजी मार्फत फायर टीव्ही स्टिक्स बनवल्या जातील.

ADVERTISEMENT

Amazon announces first device manufacturing line in India
https://blog.aboutamazon.in/our-business/amazon-announces-first-device-manufacturing-line-in-india

केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांच्यासोबत व्हिडिओ कॉलमार्फत झालेल्या बैठकीत ॲमेझॉनचे भारतातील प्रमुख अमित अगरवाल यांनी चर्चा करून नंतर ही माहिती जाहीर केली आहे.

गेल्या काही महिन्यात ॲपल, सॅमसंग अशा कंपन्यांनी त्यांची उत्पादने भारतात तयार करण्याचं जाहीर केलं आहे. आता यामध्ये ॲमेझॉनचंही नाव जोडलं जाईल.

Exit mobile version