टेलिग्राम यूजर्समध्ये मोठी वाढ : तब्बल ५० कोटीहून अधिक ॲक्टिव्ह यूजर्स!

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपने केलेल्या प्रायव्हसी बदलांमुळे अनेक जण इतर पर्यायांकडे वळत असल्याचं दिसून येत आहे. टेलिग्राम या ॲपच्या युजर्समध्ये आता मोठी वाढ झाली असून सध्या ५० कोटीहून अधिक लोक टेलिग्रामचा वापर करत आहेत अशी माहिती टेलिग्राम संस्थापक Durov यांनी दिली आहे. व्हॉट्सॲपने त्यांची नवी पॉलिसी जाहीर केल्यानंतरच्या अवघ्या ७२ तासात २.५ कोटी नव्या लोकांनी टेलिग्राम वापरण्यास सुरुवात केली आहे!

या नव्या युजर्सपैकी ३८ टक्के आशिया मधून, २७ टक्के युरोपमधून २१ टक्के लॅटिन अमेरिका तर उर्वरित MENA (मिडल ईस्ट नॉर्थ आफ्रिका) देशांमधून ८ टक्के युजर्स जोडले गेले आहेत!

तुलना करायची झाली तर व्हॉट्सॲपचे सध्या २०० कोटीहून अधिक यूजर्स आहेत! म्हणजे टेलिग्रामच्या चौपट.

टेलिग्राम व सिग्नल हे दोन पर्याय सध्या लोकप्रिय होताना दिसत आहे. असं असलं तरी लोक अजूनही व्हॉट्सॲप अनइंस्टॉल करून पूर्णपणे या ॲप्सकडे वळू शकत नाहीत कारण त्यांच्या कॉन्टॅक्टमधील बऱ्याच व्यक्ती व्हॉट्सॲप वापरत आहेत. शिवाय नोकरी/व्यावसायिक कारणांसाठीही अनेकजण व्हॉट्सॲपचा वापर करतात त्यांनाही लगेच स्विच करणं अवघड आहे. मात्र व्हॉट्सॲपची नवी पॉलिसी ८ फेब्रुवारी पासून अंमलात येणार आहे जर त्याआधी लोक स्विच झाले नाहीत आणि त्यानंतर व्हॉट्सॲपची पॉलिसी Agree करावीच लागेल आणि मग पुन्हा या ॲप्सकडे फिरकण्याची शक्यता फार कमी आहे.

या निमित्ताने अनेकजण प्रथमच डेटाबाबत थोडे का होईना जागरूक होताना दिसून येत आहेत ही एक चांगली गोष्ट आहे. अनेकांनी सिग्नलला स्विचकरून त्याबद्दल invite करणारे मेसेज सुद्धा स्टेट्सला लावल्याचं पाहायला मिळत असेलच. telegram आणि signal यांची तुलना करायची असेल तर whatsapp मधील जास्तीतजास्त सोयी telegram मध्येच पाहायला मिळतील. त्यामुळे तशा सोयीची अपेक्षा असेल तर तुम्ही telegram चा वापर करू शकता.

काल व्हॉट्सॲपने फेसबुक व्हॉट्सॲप युजर्सचे मेसेज वाचणार नाही, व्हॉट्सॲप फेसबुकसोबत कॉन्टॅक्ट शेयर करणार नाही, तुमची लोकेशन आम्हाला समजत नाही अशा अर्थाची माहिती देणारी लांबलचक पोस्ट केली आहे. मात्र आता यावर कोण किती विश्वास ठेवणार हा प्रश्नच आहे.

Exit mobile version