२०२१ च्या कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो (CES) या इलेक्ट्रॉनिक्स, तंत्रज्ञान जगातातल्या सर्वात मोठया कार्यक्रमात रेझरने प्रोजेक्ट हेजल (Project Hazel) नावाने स्मार्ट मास्क सादर केला आहे! हा एक पुनर्वापर करता येणारा N95 मास्क असून हा वॉटरप्रूफ आहे व हा रिसायकल केलेल्या प्लास्टिक पासून बनवलेला आहे. रेझरने हा जगातला सर्वात स्मार्ट मास्क असल्याचा दावा केला आहे!
यामध्ये मायक्रोफोन्स आणि amplifiers सुद्धा असून यामुळे मास्क घातलेला असताना समोरच्या व्यक्तीला बोलणं सोपं होईल अस कंपनीचं म्हणणं आहे! शिवाय नेहमीप्रमाणे रेझरने या सुद्धा उत्पादनात RGB लाईट्स (Chroma RGB LEDs) जोडल्या आहेतच. यामुळे आपण आपल्या आवडीनुसार रंग निवडून ते या मास्कवरील रिंगवर लावू शकता आणि मग त्यानुसार मास्कमधील लाईट्स चमकतील. आता याचा नेमका उपयोग काय असेल तर काहीच नाही. फक्त RGB लाईट्स असलेला मास्क घातल्याचा आनंद मात्र मिळेल!
याची किंमत अद्याप जाहीर करण्यात आलेली नसून कंपनी सध्या सरकारी परवानगी मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.
या मास्क सोबत प्रोजेक्ट ब्रुकलिन ( नावाची गेमिंग खुर्ची सुद्धा सादर करण्यात आली आहे. यामध्ये नेहमीच्या सोयींसह curved OLED screen सुद्धा जोडलेली आहे!