Hike हे भारतीय चॅट ॲप बंद होणार : कमी प्रतिसादामुळे निर्णय!

सध्या अनेक मेसेजिंग ॲप्स ॲप स्टोअरवर उपलब्ध होताना दिसून येत आहेत. व्हॉट्सॲप, टेलिग्राम, फेसबुक मेसेंजर, WeChat, SnapChat, Viber Kik, इ अनेक ॲप्स गेली काही वर्षे यूजर्ससमोर उपलब्ध आहेत. यामधील एकमेव भारतीय पर्याय जो थोडफार यश मिळवू शकला तो म्हणजे Hike Messenger (हाइक). मात्र वाढलेल्या स्पर्धेमुळे अलीकडे मिळणारा प्रतिसाद कमी झाल्यामुळे याचे संस्थापक केविन मित्तल यांनी हे ॲप आता बंद केलं जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. अधिकृतरित्या कारण सांगण्यात आलेलं नसलं तरी हे होणार हे साहजिकच होतं.

काही वर्षांपूर्वी हाइकला भारतीय यूजर्समध्ये मोठी लोकप्रियता मिळत होती. पण नंतर वाढलेली स्पर्धा आणि त्या तुलनेत नव्या सोयी जोडण्यात कमी पडल्यामुळे आता Hike चा वापर बराच कमी झाला आणि सरतेशेवटी त्यांनी हे ॲप आता बंदच करण्याचं ठरवलं आहे. विशेष म्हणजे सुरुवातीला हाइक डाउनलोड केल्यावर ऑनलाइन वॉलेटमध्ये रीचार्जसाठी काही पैसे जमा केले जायचे!

यामध्ये त्यांची बऱ्याच बाबतीत चूक आहे म्हणता येईल मेसेजिंग मध्ये स्टीकर्स आणि नज सारख्या सुविधा उपयोगी पडण्यापेक्षा जास्त त्रासदायक ठरू लागल्या. काही वर्षांपूर्वी मी स्वतः या ॲपचा वापर केला होता पण त्या नज आणि प्रचंड संख्येने येणाऱ्या स्टीकर्सच्या डोकेदुखीमुळे अनइंस्टॉल केलं होतं. हाइकवर सुरुवातीला भारतीय भाषांमध्ये स्टीकर्सचा समावेश केला होता त्यावेळी फक्त मराठी सोडून इतर भाषांमध्ये स्टीकर्स उपलब्ध झाली होती. त्यावेळी आम्ही काही इतर जागरूक यूजर्ससोबत त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती.

https://twitter.com/hikeapp/status/1349785620495777793

Hike ऐवजी त्यांनी आता आणखी काही ॲप्स आणण्याचा निर्णय घेतला असून Vibe by Hike आणि Rush by Hike हे दोन ॲप्स आता उपलब्ध होत आहेत. Vibe मध्ये invite द्वारे जोडलं जाता येईल. Rush मध्ये ऑनलाइन गेमिंगची सोय असेल ज्याद्वारे पैसे सुद्धा मिळतील!

खरतर आता व्हॉट्सॲपच्या नव्या प्रायवसी पॉलिसी अपडेटमुळे हाइकला भारतीय यूजर्स मिळवण्याची चांगली संधी आली आहे मात्र त्यांनी नेमकं याच वेळी हे ॲप बंद करण्याचं ठरवलं आहे! शिवाय हे करताना भारताला स्वतःचं मेसेजिंग ॲप मिळणार नाही असंही ट्विट द्वारे म्हणलं आहे!

https://twitter.com/kavinbm/status/1346680045251690496
Exit mobile version