FAU-G आजपासून उपलब्ध : बहुचर्चित भारतीय गेम !

गेल्या काही महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर भारताचं PUBG गेमला उत्तर म्हणून सादर करण्यात आलेली गेम FAU-G आजपासून उपलब्ध झाली आहे. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ही गेम उपलब्ध करून देण्यात आली आहे. FAU-G म्हणजे Fearless And United Guards चं संक्षिप्त रूप. गलवाण खोऱ्यामध्ये आधारित असलेली गेमची कथा भारतीय आणि चीनी सैन्यामधील लढाईच्या पार्श्वभूमीवर आली आहे.

ही गेम थेट PUBG ची प्रतिस्पर्धी म्हणता येणार नाही कारण PUBG बॅटल रोयाल प्रकरची गेम असून FAU-G स्टोरी ड्रिव्हन गेम आहे. अपेक्षेपेक्षा बरं ग्राफिक्स चांगलं देण्यात आलं असलं तरी यामध्ये सध्यातरी बंदूकांचा समावेश केलेला नाही. अनेक गेमर्सनी लगेच यावर नाराजी व्यक्त केली आहे. नवी गेम असल्यामुळे पुढे पुढे पर्याय जोडले जातील अशी चर्चा आहे.

सध्याचं चित्र पाहता गेम भारतीयत्वावर मार्केट करून आणण्यात आली असली तरी पुढे यापैकी किती गेमर्स ही गेम खेळत राहतील ते येणाऱ्या काळात समजेल. आत्ता या गेममध्ये मल्टीप्लेयर मोड नाही त्यामुळे तुम्हाला फक्त शत्रूला बुक्की मारत पुढे सरकत राहायच एव्हढीच गोष्ट यामध्ये करत राहावं लागतं.

एव्हढया मोठ्या प्रमाणात मार्केट करण्यात आलेली FAUG भारतीय गेम असली तरी ही काही पहिली भारतीय गेम म्हणता येणार नाही. अगदी अलीकडेच आलेली Raji नावाची गेम सुद्धा चांगल्या भारतीय गेमचं उदाहरण आहे.

Download FAUG on Google Play : https://play.google.com/store/apps/details?id=com.ncoregames.faug

Exit mobile version