Cyberpunk 2077 ही बहुप्रतिक्षित गेम आता उपलब्ध : अनेक नवे विक्रम!

Cyberpunk 2077 ही गेम २०१३ मध्ये एका व्हिडिओ ट्रेलरद्वारे जाहीर करण्यात आली होती. तेव्हापासून गेमर्सना या गेमबाबत उत्सुकता होती. शेवटी सात वर्षानी एकदाची ही गेम उपलब्ध झाली असून या गेमला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अशा मोठ्या मॅप्स असलेल्या सिंगल प्लेयर गेम्स तयार करण्यासाठी शक्यतो अनेक वर्षांचा कालावधी लागतोच. या गेमने ट्विच, स्टीम अशा प्लॅटफॉर्मवर अवघ्या एक दोन दिवसातच अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. ही गेम पीसी, प्लेस्टेशन आणि एक्सबॉक्सवर उपलब्ध झाली आहे.

ट्विच (Twitch) या लोकप्रिय गेम स्ट्रीमिंग सेवेमध्ये सिंगल प्लेयर गेमसाठी एकाचवेळी स्ट्रीमिंग पाहण्यात आजपर्यंत सर्वाधिक प्रेक्षक मिळाले आहेत. स्टीमवर सुद्धा एकावेळी सर्वाधिक गेमर्स गेम खेळत असल्याचा विक्रम आता या गेमच्या नावावर झाला आहे. या गेममधील मॅप GTA 5 च्या दुप्पट आकाराचा आहे असं सांगण्यात येत आहे. नाइट सिटी नावाच्या शहरात भविष्यातील शहराची कल्पना करून त्यामधील घडामोडींवर गेमचं कथानक आपण केलेल्या निवडीनुसार पुढे सरकतं! शिवाय या गेममध्ये कियानू रिव्ह्जला सुद्धा एक स्वतंत्र कॅरक्टर म्हणून घेण्यात आलं आहे.

बरीच चर्चा सुरू असली तरी अनेकांनी त्यांच्याकडे गेम व्यवस्थित चालत नसल्याची तक्रार केली आहे. नवीन गेम असल्यामुळे हे काही प्रमाणात अपेक्षित असलं तरी bugs, glitches चं प्रमाण कमी करण्यात ही गेम सुरुवातीला कमी पडली आहे. येत्या काही दिवसात येणाऱ्या अपडेट्सद्वारे या अडचणी दूर करण्यात येईल असं या गेमची निर्माती कंपनी CD Projekt Red यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.

https://www.cyberpunk.net/in/en/

या गेमची किंमत भारतात पीसीसाठी २९९९ आणि एक्सबॉक्स व प्लेस्टेशनसाठी ३४९९ अशी असणार आहे.

टीप : या गेममध्ये हिंसक दृश्यं आहेत. स्वतःच्या जबाबदारीवर ट्रेलर पहावा.

Exit mobile version