सॅमसंगने काल त्यांच्या फुल ऑन फेस्टिवल कार्यक्रमात नवा स्मार्टफोन सादर केला असून यासाठी त्यांनी बऱ्याच सेलेब्रिटी आणि इन्फ्लूएन्सर्सना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केलं. हा Galaxy F41 फोन त्यांच्या Galaxy F मालिकेतला पहिलाच फोन आहे. यामध्ये 6.4″ sAMOLED डिस्प्ले 64MP ट्रिपल कॅमेरा, 6000mAh बॅटरी अशा सुविधा मिळतील.
या फोनमध्ये सॅमसंगने तोच जुना Exynos 9611 प्रोसेसर दिला असून यामुळे अनेकांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे मात्र सॅमसंगने यामधून काहीही बोध घेतलेला दिसत नाही. या फोनची किंमतसुद्धा त्यांच्या इतर मॉडेल्सच्या जवळपास असल्यामुळे यामध्ये नवं असं काहीच दिसून येत नाही. अगदी १२००० किंमतीच्या फोनमध्येही तोच प्रोसेसर आणि २०००० च्या फोनमध्येही तोच प्रोसेसर असेल तर हे फोन कशा प्रकारे सारखेच काम करतील आणि यामध्ये फरक तो काय असणार आहे हे त्यांनाच ठाऊक…! हा फोन १६९९९ (6GB+64GB) आणि १७९९९ (6GB+128GB) या किंमतीत उपलब्ध होईल. या फोनचा पहिला सेल १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये असेल.
डिस्प्ले : 6.4″ FHD+ sAMOLED Display
प्रोसेसर : Exynos 9611
रॅम : 6GB
स्टोरेज : 64GB/128GB
कॅमेरा : 64MP Triple Camera + 8MP Ultrawide + 5MP Depth Live Focus
फ्रंट कॅमेरा : 32MP
बॅटरी : 6000mAh 15W Flash Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : OneUI based Android 10
सेन्सर्स : Fingerprint (rear-mounted), accelerometer, gyro, proximity, compass
रंग : Fusion Black, Fusion Blue, Fusion Green
किंमत : हा फोन १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या फ्लिपकार्टवर उपलब्ध होत आहे.
6GB+64GB ₹16999
6GB+128GB ₹17999
Buy Galaxy F41 Link : http://fkrt.it/s_7f58uuuN
गेले काही दिवस आम्ही इतर ब्रॅंड्सबद्दल लेख प्रकाशित केले नाहीत मात्र जर सॅमसंगसारखे ब्रॅंड तेच तेच हार्डवेअर आणि
कोणत्याही नवीन सुविधा न देता स्मार्टफोन आणत असतील तर आम्हाला पण इतर पर्याय आणि त्यांची माहिती द्यावी लागेल.