VI (वी) व्होडाफोन आयडियाचा आता नवा ब्रॅंड, नवा लोगो!

गेले काही महिने जिओ आणि एयरटेलकडे मोठ्या प्रमाणात ग्राहक वळत असल्याने डबघाईला आलेल्या व्होडाफोन आयडियाने शेवटी काही पावले उचलून नव्याने उभारण्याचा निर्णय घेत आता नवा ब्रॅंड सादर केला असून यांचं नवं नाव आता VI (वी) असणार आहे! याचा उच्चार वी (WE प्रमाणे) केला जाईल. यासाठी नवा लोगो नवे प्लॅन्ससुद्धा आणले जात आहेत.

व्होडाफोन आणि आयडिया यांच्या नेटवर्कचं इंटिग्रेशन आता पूर्ण झालं असल्याचंही त्यांनी जाहीर केलं असून एव्हढया मोठ्या प्रमाणावरचं हे इंटिग्रेशन विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आलं आहे. या दोन कंपन्या एकत्र आल्यापासून त्यांनी त्यांचं 4G नेटवर्क कव्हरेज दुप्पटीने वाढवलं आहे. त्यांचं नेटवर्क आता सर्वाधिक स्पेक्ट्रम पोर्टफोलियो असणारं असून 5G साठीही तयार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Vi ची अधिकृत वेबसाइट : https://myvi.in/

स्पर्धेच्या तुलनेत सतत ग्राहक कमी होत असताना व्होडाफोन आयडियाने शेवटी काहीतरी हालचाल करण्याचा निर्णय निकोप स्पर्धेसाठी चांगलाच आहे. अन्यथा या भारतातल्या टेलीकॉम विश्वात केवळ जिओ आणि एयरटेल हे दोनच पर्याय उरले असते ज्यामुळे त्यांची ड्युओपॉली (दोघांची एकाधिकारशाही) झाली असती. त्यातही वरचेवर जिओचच वर्चस्व दिसून येत आहे.

https://twitter.com/Idea/status/1302617391726080000

Exit mobile version