ॲपल वॉच Series 6, स्वस्त Watch SE, आयपॅड, आयपॅड एयरची नवी आवृत्ती सादर!

काल ॲपलने त्यांच्या ॲपल इव्हेंटमध्ये काही नवी उत्पादने सादर केली असून यामध्ये दोन ॲपल वॉच, दोन आयपॅड, Fitness+ सेवा, Apple One सेवा यांचा समावेश आहे. प्रथमच ॲपलला सप्टेंबर महिन्यात आयफोन सादर करता आला नसून covid19 मुळे त्यांच्या फोन निर्मिती प्रक्रियेत अडथळे आले ज्यामुळे iPhone 12 चं लॉंच त्यांना पुढं ढकलावं लागलं असं दिसत आहे.

ॲपल वॉचचे दोन नवे मॉडेल Series 6 आणि Apple Watch SE असे असतील. नेहमीच्या ॲपल वॉचमध्ये नवी आवृत्ती असलेल्या Apple Watch Series 6 मध्ये आता ब्लड ऑक्सिजनसुद्धा मोजता येणार आहे! सध्या कोरोनासाठी प्राथमिक चाचणी म्हणून हे पाहिलं जातं. १५ सेकंदात ब्लड ऑक्सिजन आपल्याला दाखवू शकेल! याची भारतीय किंमत ४०९०० असणार आहे.
यासोबत एक स्वस्त घडयाळ सुद्धा ॲपलने आणलं असून Apple Watch SE ची किंमत २९९०० असणार आहे.

ॲपलने दोन नवे आयपॅडसुद्धा आणले असून स्वस्त पर्याय म्हणून असलेला नेहमीचा आयपॅड (Apple iPad 8th Gen) आता A12 प्रोसेसर सह येईल. याची किंमत २९९०० पासून सुरू असेल.

सोबत आलेला नवा iPad Air मात्र नक्कीच उत्तम पर्याय ठरणार आहे. यामध्ये आणि iPad Pro मध्ये बरच साधर्म्य असून याची किंमतही त्या मानाने कमी आहे. शिवाय यामध्ये सर्वात नवा A14 Bionic प्रोसेसर देण्यात आला आहे! आनंदाची बाब म्हणजे ॲपलने या टॅब्लेटला Type C USB पोर्ट दिला आहे! याची भारतीय किंमत ५४९०० पासून सुरू आहे.

ॲपलने त्यांच्या विविध सेवा एकत्र आणणारी सेवा आणली असून या सेवेचं नाव ॲपल वन (Apple One) असं असणार आहे. यामध्ये Apple Music, Apple TV+, Apple Arcade व iCloud Storage मिळेल! यामधील विविध प्लॅन्सनुसार Fitness+ आणि Apple News+ व अधिकच स्टोरेज मिळेल असे प्रीमियर प्लॅन्स आहेत.

आयफोन्ससाठी iOS 14 अपडेट सुद्धा उपलब्ध होण्यास आजपासून सुरुवात होणार आहे. iPad व Apple Watch साठीही अपडेट्स उपलब्ध होतील.

https://youtu.be/r_VSll0WLZE
Exit mobile version