ॲमेझॉनच्या रिंगचा उडणारा होम सिक्युरिटी ड्रोन कॅमेरा!

ॲमेझॉनकडे मालकी असलेल्या रिंग (Ring) या कंपनीने Always Home Cam आणला असून हा एक ड्रोन आहे जो आपल्या घरातच उडेल. आपण घरी नसताना हा ड्रोन घरी लक्ष ठेवेल आणि आपण आपल्या फोनमध्ये याचा लाईव्ह व्हिडिओ पाहू शकाल! काम झालं की हा ड्रोन त्याच्या डॉकमध्ये जाऊन बसेल आणि स्वतःची बॅटरी चार्ज करण्यास सुरुवात करेल.

रिंग कंपनीतर्फे या कॅमेराबाबत असं सांगण्यात आलं आहे की हा ड्रोन कॅमेरा आपल्या घरातील एकापेक्षा अधिक ठिकाणाची दृश्यं दाखवू शकेल ज्यामुळे अनेक कॅमेरा लावत बसण्याची गरज उरणार नाही. हा कॅमेरा स्वयंचलित असला तरी आपण त्याला मार्ग सांगून स्वतः सुद्धा फोनद्वारे देखरेख करू शकाल. आपल्या घराचा मॅप सेट करून द्यावा लागेल. जयनंतर तुम्ही कॅमेराला हॉल, किचन, बेडरूम असे पर्याय वापरुन त्या त्या ठिकाणी जायला सांगू शकता!

शिवाय या रिंग कंपनीचं दुसरं उत्पादन जे आपल्या घरी कोणी घुसत असेल तर त्याबद्दल अलर्ट देतं ते सुद्धा या कॅमेराला जोडता येतं यामुळे जर त्या अलार्म सिस्टमला तसा प्रकार आढळला तर हा ड्रोन कॅमेरा स्वतः त्या दिशेने उडत जाईल आणि त्या व्यक्तीचा लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड करेल!

रिंग कंपनी स्मार्ट होम उपकरणे बनवते फेब्रुवारी २०१८ मध्ये ॲमेझॉनने रिंग कंपनीचं अधिग्रहण केलं आहे. या कॅमेरामागचा उद्देश चांगला असला तरी अनेकांनी प्रायवसीच्या दृष्टिकोनातून हे उपकरण चांगलं नसेल असं सांगितलं आहे. शिवाय हॅक होण्याचा धोका आहेच यावर रिंगतर्फे हा कॅमेरा केवळ उडत असतानाच रेकॉर्ड करेल आणि तसा आवाजसुद्धा येईल. आणि त्याच्या डॉकमध्ये बसल्यावर कॅमेरा झाकला गेलेला असेल असं सांगितलं आहे.

याची किंमत $249 (~१८४००) असेल सांगण्यात येत आहे आणि हा पुढच्या वर्षी खरेदीसाठी उपलब्ध होईल.

Search Terms : Amazon ring Always Home Drone Camera Always Home Cam Flying Security Drone Camera

Exit mobile version