नोकियाने आज चार नवे फोन भारतात सादर केले असून यामधील दोन स्मार्टफोन्स आहेत तर दोन फीचर फोन्स आहेत. Nokia 5.3 हा मध्यम किंमतीत तर Nokia C3 हा कमी किंमतीच्या स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध असेल. Nokia 125 आणि Nokia 150 हे दोन्ही फीचर म्हणजे बेसिक फोन्स आहेत.
Nokia 5.3 : नोकीयाने बऱ्याच दिवसात नवा स्मार्टफोन आणला नव्हता. आज आलेल्या या फोनमध्ये 6.55″ HD+ डिस्प्ले असून Snapdragon 665 प्रोसेसर आहे. या फोनला 4GB+64GB व 6GB+64GB असे दोन पर्याय आहेत. कॅमेरासाठी यात पाठीमागे चार कॅमेरा सेन्सर असून 13MP + 2MP depth + 5MP ultrawide + 2MP Macro असा सेटप आहे. फ्रंट कॅमेरा 8MP आहे. यामध्ये 4000mAh ची बॅटरी असून फास्ट चार्जिंग देण्यात आलेलं नाही. हा फोन सादर होत असतानाच इतर फोन्सच्या तुलनेत काहीसा मागे पडला आहे. नोकियाला मिळणारा अँड्रॉइडचा सपोर्ट ही यांची एक जमेची बाजू आहे.
हा फोन १ सप्टेंबरपासून उपलब्ध होत असून याची किंमत १३९९९ व १५४९९ अशी आहे
Nokia C3 : हा एक बजेट स्मार्टफोन असून याची किंमत ७४९९ (2GB) आणि ८९९९ (3GB) अशी आहे. हा फोन १७ सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे. यामध्ये 5.99 इंची HD+ डिस्प्ले, 3040mAh बॅटरी, 8MP कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा मिळेल.
Nokia 150 व Nokia 125 : Nokia 150 ची किंमत ₹2,299 आहे तर Nokia 150 ची ₹1,999. दोन्ही फोन खरेदीसाठी उपलब्ध आहेत.