गूगलचा Pixel 4A भारतात सादर : स्वस्तात पिक्सल स्मार्टफोन!

गूगलचा बहुप्रतिक्षित Pixel 4a आज एकदाचा सादर झाला असून गूगलने या फोनची किंमत आधीच्या मॉडेलपेक्षाही कमी ठेवण्यात आली आहे. या फोनमध्ये 5.81″ इंची डिस्प्ले, Snapdragon™ 730 प्रोसेसर, 3140 mAh बॅटरी देण्यात आली आहे. सोबत HDR+, Night Sight सारख्या सोयींचाही समावेश आहे.

अपडेट ०९-१०-२०२० : हा फोन आता भारतात सादर झाला असून १६ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये मिळेल. याची किंमत ₹२९९९९ अशी असणार आहे. मात्र ही किंमत मर्यादित कालावधीसाठीच असून एरवी हा फोन ३१९९९ रुपयांना मिळेल!

सध्याच्या इतर फोन्सच्या मानाने यामधील हार्डवेअर फारच कमी वाटत आहे. मात्र यामधील कॅमेरा नक्कीच कमी मेगापिक्सल असूनही इतरांपेक्षा चांगला असेल. पिक्सल फोन्समधील कॅमेरा आणि त्याचं सॉफ्टवेअर गूगल त्यांच्याकडील खास गोष्टी वापरुन बनवलेला असतो. या फोनचं लॉंच बऱ्याच वेळा पुढे ढकलण्यात आलं होतं. प्रत्यक्षात भारतात येण्याससुद्धा आणखी काही महीने जातील.

Google Pixel 4a

डिस्प्ले : 5.81″ display Full-HD+ punch-hole OLED (with transmissive hole)
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 730
GPU : Adreno 618
रॅम : 6GB LPDDR4x
स्टोरेज : 128GB
कॅमेरा : 12.2MP dual pixel phase detection
फ्रंट कॅमेरा : 8MP
बॅटरी : 3140mAh + 18 W fast charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Android 10
इतर : Wi-Fi 2.4 GHz + 5 GHz 802.11a/b/g/n/ac 2×2 MIMO, Bluetooth® 5.1 + LE, A2DP, NFC, Google Cast, GPS, GLONASS, Galileo, QZSS, BeiDou
सेन्सर्स : Proximity/Ambient light sensor, Accelerometer/Gyrometer, Magnetometer, Pixel Imprint™ – back-mounted fingerprint sensor for fast unlocking, Barometer, Android Sensor Hub
रंग : Just Black
किंमत : हा फोन ऑक्टोबरमध्ये भारतात फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. http://fkrt.it/tHcQocNNNN
6GB+128GB $349

https://youtu.be/v_f3Km_eQnw
Exit mobile version