फेसबुक AI मुळे MRI स्कॅन मिळणार अवघ्या काही मिनिटांत!

मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (MRI) मुळे गेली अनेक डॉक्टरांना रुग्णाच्या शरीराच्या आतील भागाची महत्वाची माहिती मिळण्यात मोठी मदत होते. मात्र ही एमआरआय मशीन बऱ्यापैकी सावकाश काम करते आणि या प्रक्रियेदरम्यान रुग्णांना स्थिर झोपून रहावं लागतं. यामुळे लहान मुलांना भूल द्यावी लागते आणि काही रुग्णांची तब्येत बिघडलेली असते किंवा स्ट्रोक्स सारख्या समस्या येत असतात अशावेळी हे स्कॅन्स करणं अवघड जातं. दोन वर्षांच्या रिसर्चनंतर फेसबुक AI आणि NYU (न्यूयॉर्क यूनिवर्सिटी) यांच्या सदस्यांनी मिळून असं न्यूरल नेटवर्क तयार केलं आहे जे MRI मध्ये जाणारा तासांचा वेळ अवघ्या काही मिनिटांवर आणणार आहे! यासाठी त्यांनी AI म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर केला आहे.

या नेटवर्कचं नाव त्यांनी fastMRI असं ठेवलं असून स्कॅन केलेली इमेज मिळवण्यासाठीचा वेळ बराच कमी होणार आहे. MRI मशीन एक तात्पुरतं चुंबकीय क्षेत्र (Magnetic Field) तयार करतं. ज्यावेळी हायड्रोजन सारख्या आण्विक केंद्रके (Atomic Nuclei) या चुंबकीय क्षेत्राच्या संपर्कात येतात तेव्हा त्यामधील रेडियो फ्रिक्वेन्सी (RF) एनर्जी शोषून घेतात आणि परत मोजता येतील अशा रूपात उत्सर्जित करतात. जर तुम्ही MRI मध्ये बसला असाल तर मशीन जेव्हा डेटा गोळा करते तेव्हा तिथे येणारा आवाज आपण ऐकला असेलच. तो एक रॉ म्हणजे कच्च्या स्वरूपाचा डेटा असतो ज्यापासून नंतर magnetic resonance इमेज म्हणजेच MRI स्कॅन तयार होतो.

MRI Scan

फेसबुकने याच्या चाचणीसाठी सहा रेडियोलॉजिस्टची नियुक्ती केली होती. यापैकी पाच जणांना AI ने तयार केलेल्या आणि नेहमीच्या पद्धतीने तयार केलेल्या MRI मध्ये फरक जाणवला नाही.

ही सिस्टम सध्या उपलब्ध असलेल्या MRI मशीन्समध्येही वापरता येणार आहे! शिवाय हे फेसबुकतर्फे ओपन सोर्स करण्यात आलं आहे त्यामुळे जगभरात सर्वत्र हे तंत्रज्ञान मोफत वापरता येईल. यामुळे सध्या कोणीही याची चाचणी घेऊ शकतो. या चाचण्यांमुळे यामध्ये आणखी सुधारणा करणे शक्य होणार आहे. MRI मशीन्स तयार करणाऱ्या कंपन्याना प्रत्यक्ष रुग्णांवर वापर करण्याआधी परवानग्या घ्याव्या लागणार आहेतच.

संदर्भ व अधिक माहिती : https://engineering.fb.com/ai-research/fastmri

(या लेखातील माहिती इंग्रजीमधून भाषांतरित करण्यात आली असून काही तांत्रिक शब्दांमध्ये चूक झालेली असू शकेल. जर वाचकांपैकी कुणी तज्ञ लक्षात आणून देणार असतील तर त्यानुसार बदल करण्यात येतील.

Exit mobile version