अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर सोनीने त्यांचा Sony Alpha A7S III कॅमेरा आज सादर केला असून यामधील व्हिडिओ सुविधांमुळे हा कॅमेरा 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी सर्वोत्तम कॅमेरापैकी एक आहे. α7S III हा व्हिडिओग्राफर्ससाठी सध्या उपलब्ध कॅमेरामध्ये बेस्ट पर्याय म्हणता येईल. यामध्ये ओव्हरहिटिंगचा प्रॉब्लेम नसल्यामुळे 4K रेकॉर्डिंग अनेक तास सलग करता येणार आहे!
यामध्ये बऱ्याच गोष्टी प्रथमच देण्यात आल्या असून अनेक वर्षं मागणी करण्यात येत असलेली बाजूला फिरवता येईल अशी स्क्रीन देण्यात आली असून नवं मेन्यू डिझाईनसुद्धा देण्यात आलं आहे. आता या कॅमेरामध्ये टचद्वारे नॅव्हिगेट करता येईल. यामध्ये नवी Bionz XR चिप देण्यात आलेली आहे आणि 12 Megapixel चा Exmor R सेन्सर आहे. जो आताच्या काळात कमी वाटत असला तरी व्हिडिओसाठी यामुळेच अनेक सुविधा देता येतात. तरीही आणखी मेगापिक्सल्सचा समावेश करायला हवा होता असं अनेकांचं मत आहे.
A7S III अलीकडेच आलेल्या कॅननच्या EOS R5 प्रमाणे 8K रेकॉर्डिंग करू शकत नाही. मात्र 4K मध्येच उपलब्ध सर्व सोयी जोडण्याचा प्रयत्न सोनीने केला आहे ज्या कॅनन R5 पेक्षाही चांगल्या आहेत असं अनेक रिव्यूअर्सचं मत आहे. किंमत कमी असल्यामुळे A7SIII पेक्षा EOS R6 सुद्धा चांगला पर्याय आहे असंही काही जणांनी सांगितलं आहे.
Sony Alpha 7S III अधिक माहितीसाठी लिंक : https://bit.ly/333wt0s
हा कॅमेरा 10bit 4:2:2 व्हिडिओ इंटर्नली रेकॉर्ड करू शकतो. FullHD रेजोल्यूशनमध्ये 240fps स्लो मो व्हिडिओ आणि 4K मध्ये 120fps स्लो मो रेकॉर्ड करता येईल! यामध्ये HDMI Port, Headphone Port, Mic Port, Type C Port, MicroUSB Port हा कॅमेरा ऑगस्ट मध्ये खरेदीसाठी उपलब्ध होत असून याची किंमत कॅमेरा बॉडीसाठी $3500 (~२६२०००) इतकी आहे. भारतीय किंमत नंतर जाहीर केली जाईल.