पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी आत्मनिर्भर भारत ॲप इनोव्हेशन चॅलेंज जाहीर केलं असून याद्वारे स्टार्टअप्स किंवा डेव्हलपर्सना जागतिक दर्जाची मेड इन इंडिया ॲप्स बनवण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. हा उपक्रम इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय आणि अटल इनोव्हेशन मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती मोदींनी स्वतः ट्विटरवर शेयर केली असून चीनी ॲप्सवर बंदी घातल्यानंतर पर्यायी भारतीय ॲप्स तयार करण्याच्या उद्देशाने ही पाऊल उचलण्यात आलं आहे. भारतात सध्या जागतिक दर्जाचं भारतीय ॲप्स व प्रॉडक्टस तयार करण्यासाठी उत्साह दिसून येत असून त्यासाठीच हे चॅलेंज सादर करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी अधिकृत लिंक : https://innovate.mygov.in/app-challenge/
हे चॅलेंज पुढील प्रकारांमध्ये विभागलेल असेल. यामध्ये चक्क गेमिंगचाही समावेश आहे हे विशेष!
- Office Productivity & Work from Home
- Social Networking
- E-Learning
- Entertainment
- Health & Wellness
- Business including Agritech and Fintech
- News
- Games
या चॅलेंजमध्ये सहभागी होऊन जिंकणाऱ्या स्टार्टअप/डेव्हलपरला पुढीलप्रमाणे बक्षिसे देण्यात येणार आहेत! वर दिलेल्या यादीतील प्रत्येक प्रकारातील विजेत्यांना पुढील प्रमाणे बक्षिसे असतील
First Prize 20 Lakhs
Second Prize 15 Lakhs
Third Prize 10 Lakhs
जर या प्रकारांमध्ये उपप्रकार करण्याचा निर्णय झाला तर त्याचं विभाजन पुढील प्रमाणे असेल.
First Prize 5 Lakhs
Second Prize 3 Lakhs
Third Prize 2 Lakhs
यासंबंधित माहितीसाठी पंतप्रधान मोदींनी लिंक्डइनवरही पोस्ट केली आहे : linkedin.com/pulse/let-us-code-aatmanirbhar-bharat-narendra-modi
Seach Terms : PM Modi announces Digital India AatmaNirbhar Bharat App Innovation Challenge to facilitate Made in India apps