ॲमेझॉन Pantry सेवा आता ३००+ शहरांमध्ये उपलब्ध : किराणा सामान ऑनलाइन!

ॲमेझॉनने काल जाहीर केलेल्या माहितीनुसार ॲमेझॉनची किराणा वस्तु डिलिव्हर करणारी सेवा Amazon Pantry आता ३०० हून अधिक शहरांमध्ये मिळणार आहे! नव्याने जोडण्यात आलेल्या शहरांमध्ये भारतातील उत्तरेकडची शहरे जास्त दिसून येत आहेत. सध्या COVID19 मुळे होम डिलिव्हरीच्या मागणीत झालेली वाढ लक्षात घेऊन ॲमेझॉनने हे पाऊल उचललं असावं.

Amazon Pantry द्वारे किराणा माल, घरगुती वापराच्या वस्तू आणि गरजेच्या गोष्टी ज्या ३००० हुन अधिक उत्पादने आणि २०० हुन अधिक ब्रँड्समध्ये उपलब्ध आहेत या १-२ दिवसात ग्राहकांना डिलिव्हरी केल्या जातील! बेंगळुरू, दिल्लीम मुंबई, पुणे चेन्नई, हैदराबाद आणि कोलकाता या प्रमुख शहरांमध्ये ग्राहकांना डिलिव्हरीच्या वेळेचा स्लॉट निवडण्याचीसुद्धा सोय आहे. इतर शहरांना मात्र ही सोय अद्याप दिलेली नाही.

किराणा माल ऑर्डर करताना ॲमेझॉनचा वापर केल्याने ग्राहकांची ३५ टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते असं ॲमेझॉनने सांगितलं आहे. ॲमेझॉनची ही सेवा आता १०००० पिनकोड्सवर सेवा देणार आहे. तुमच्या शहराबाबत उपलब्धता जाणून घेण्यासाठी लॉगिन करून amazon.in/pantry या लिंकवर जा.
महाराष्ट्रात सध्या पुणे, मुंबई, सांगली, तळेगाव, ठाणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर इथे उपलब्ध आहे. नव्याने जोडलेल्या शहरांच्या नावांची यादी उपलब्ध नसल्याने तुम्हाला स्वतःलाच हे तपासावं लागेल.

Amazon Fresh ची सेवा आता सहा शहरांमध्ये उपलब्ध होत आहे. याद्वारे अवघ्या दोन तासात वस्तु घरी पोहोचवल्या जातात. काही महिन्यांपूर्वी सादर करण्यात आलेलं Prime Now अॅप आता बंद करून मुख्य Amazon मध्येच त्याची सेवा दिली जाईल अशीही माहिती आहे.

या ऑनलाईन वेबसाइटच्या सेवा लोकप्रिय होत गेल्या तर स्थानिक दुकानदारांवर परिणाम होऊ शकतो. अलीकडे यामुळे ॲमेझॉनला विरोधसुद्धा झाला आहे म्हणून यासाठी स्थानिक दुकानदारांना सहभागी करून काम करण्याचे ॲमेझॉनतर्फे प्रयत्न सुरु आहेत.

Exit mobile version