Realme Narzo 10 व Narzo 10A सादर : रियलमीची नवी फोन मालिका!

भारतातील सर्वात वेगाने वाढणारी स्मार्टफोन कंपनी रियलमीने काल त्यांची नवी स्मार्टफोन मालिका Narzo सादर केली असून या अंतर्गत त्यांनी दोन स्मार्टफोन्स उपलब्ध केले आहेत. गेले काही दिवस त्यांनी या फोनचं लॉंचिंग पुढं ढकलावं लागलं होतं. Narzo 10 आणि Narzo 10A ही दोन फोन्स गेमर्सना समोर ठेऊन स्वस्त पर्याय तयार करण्यात आलेले फोन्स आहेत असं सांगण्यात आलं आहे. realme Narzo 10 ची किंमत ११९९९ पासून सुरू होते तर Narzo 10A ची ८४९९ पासून…

realme Narzo 10

डिस्प्ले : 6.5” Mini-drop Fullscreen
प्रोसेसर : MediaTek Helio G80
GPU : Mali-G52
रॅम : 4GB LPDDR4x
स्टोरेज : 128GB UFS 2.1
कॅमेरा : 48MP Quad Camera + 8MP Ultrawide + B&W Portrait lens + 2MP Macro Lens
फ्रंट कॅमेरा : 16MP
बॅटरी : 5000mAh 18W Quick Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : realmeUI based on Android 10
इतर : 802.11a/b/g/n/ac, Bluetooth 5, WiFi, Fingerprint Scanner, 2 SIM Slot + 1 MicroSD Slot, Dolby Atmos
सेन्सर्स : Magnetic induction sensor / Light sensor / Proximity sensor / Gyro-meter / Acceleration sensor
रंग : That White, That Green
किंमत : हा फोन १८ मे दुपारी १२ पासून realme.com वर उपलब्ध होत आहे.
4GB+128GB ₹11899

realme Narzo 10A

डिस्प्ले : 6.5” Mini-drop Fullscreen
प्रोसेसर : MediaTek Helio G70
GPU : Mali-G52
रॅम : 3GB
स्टोरेज : 32GB + Up to 256GB external memory
कॅमेरा : 12MP Triple Camera + 2MP Portrait lens + 2MP Macro Lens
फ्रंट कॅमेरा : 5MP
बॅटरी : 5000mAh 10W Quick Charge
ऑपरेटिंग सिस्टिम : realmeUI based on Android 10
इतर : 802.11 b/g/n, Bluetooth 5, WiFi, Fingerprint Scanner, 2 SIM Slot + 1 MicroSD Slot, Dolby Atmos
सेन्सर्स : Light sensor, Proximity sensor, Magnetic induction sensor, Acceleration sensor, Fingerprint
रंग : So Blue, So White
किंमत : हा फोन २२ मे दुपारी १२ पासून realme.com वर उपलब्ध होत आहे.
3GB+32GB ₹8499

सध्या भारतात सोशल मीडियावर सुरू असलेल्या चीनी फोन्स आणि कंपन्याविरोधातील मोहीम पाहता या फोन्सची मागणी काही प्रमाणात कमी होऊ शकते. भारतीय स्मार्टफोन कंपन्या जवळपास नाहीशा झाल्या असल्या तरी सॅमसंग सारख्या चीनी नसलेल्या कंपनीला प्राधान्य द्यावं असं या मतप्रवाहात सांगण्यात येत आहे. दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच फोन्सवरील नवीन GST लागू झाल्यामुळे आधीच फोन्सच्या किंमती वाढल्या आहेत… यामुळे एकतर किंमत वाढवा किंवा आहे त्या किंमतीत कमी सुविधा द्या असा पर्याय चीनी कंपन्याना निवडावा लागेल…

Exit mobile version