नवा अॅपल मॅकबुक प्रो सादर : नव्या प्रोसेसर , किबोर्डसह 4TB स्टोरेज पर्याय!

अॅपलने त्यांची मॅकबुक प्रो मालिका अपडेट केली असून आता १३ इंची डिस्प्लेमध्ये नव्या सोयी जोडण्यात आल्या आहेत. Apple Macbook Pro 13″ 2020 मध्ये आता नवा मॅजिक किबोर्ड देण्यात आला आहे. मॅजिक कीबोर्ड म्हणावं असं जादुई यामध्ये काही नाही मात्र अॅपलच्या नाव ठेवण्याला कोण नावे ठेवणार? यापूर्वीचा बटरफ्लाय किबोर्ड काढून टाकण्यात येत आहे. या नव्या मॅकबुक्समध्ये इंटेलचे लेटेस्ट 10th Gen प्रोसेसर असून ८० टक्के अधिक वेगवान ग्राफिक्स कामगिरी करतात! याची भारतातील किंमत १,२२,९९० पासून सुरू होते!

नव्या मॅकबुकमध्ये १३.३ इंची बॅकलिट एलईडी डिस्प्ले असून याचं रेजोल्यूशन 2560×1600 इतकं आहे. P3 Color Gamut सपोर्ट आणि ट्रू टोन टेक्नॉलॉजीचाही समावेश आहेच. यामध्ये इंटेल 8th Gen आणि 10th Gen असे दोन्ही प्रोसेसर पर्याय उपलब्ध आहेत. स्टोरेजसाठी 256GB पासून 4TB पर्यंत पर्याय आहे. रॅम 8GB पासून 32GB पर्यंत घेता येऊ शकते.

Apple Macbook Pro 13″ 2020

डिस्प्ले : Retina display 13.3‑inch (diagonal) LED-backlit display with IPS technology; 2560‑by‑1600 native resolution at 227 pixels per inch with support for millions of colors
प्रोसेसर : 2.3GHz quad‑core 10th‑generation Intel Core i7, Turbo Boost up to 4.1GHz/2.0GHz quad‑core 10th‑generation Intel Core i5/1.7GHz quad‑core 8th‑generation Intel Core i7/1.4GHz quad‑core 8th‑generation Intel Core i5
स्टोरेज : 256GB/512GB/1TB/2TB/4TB SSD
रॅम : 8GB/16GB/32GB
Graphics : Intel Iris Plus Graphics 645

Exit mobile version