जगातल्या सर्वात लोकप्रिय गेम्स पैकी एक असलेली GTA म्हणजे ग्रँड थेफ्ट ऑटो या गेमची पाचवी आवृत्ती Grand Theft Auto V Premium Edition आजपासून २१ मे पर्यंत Epic Game Store वर चक्क मोफत उपलब्ध होत आहे! काल चुकून केलेल्या ट्विटमध्ये ही गेम यावेळच्या Mystery Free Game मध्ये उपलब्ध होणार असल्याचं समजल्यामुळे आज अनेकांनी गेम फुकट मिळवण्यासाठी एपिक गेम लॉंचर घेऊन प्रयत्न केला खरा पण अचानक मोठ्या प्रमाणात लोड आल्यामुळे हे ऑनलाइन गेम स्टोअर अनेक तास बंद पडलं. आता आम्ही पाहिलेल्या माहितीनुसार गेम लॉंचरची सेवा पूर्ववत झाली असून आता गेम तुम्ही तुमच्या गेम लायब्ररीमध्ये जोडू शकता.
रॉकस्टार गेम्सने डेव्हलप केलेली ही गेम प्रथम Xbox 360 आणि PlayStation 3 वर २०१३ मध्ये सादर झाली होती. त्यानंतर एप्रिल २०१५ मध्ये पीसी म्हणजे विंडोजवर ही गेम उपलब्ध करून देण्यात आली होती. २०१९ मध्ये आलेल्या माहितीनुसार या गेमच्या जवळपास ११ कोटी कॉपी विकल्या गेल्या आहेत. २०२० मध्ये तर ही संख्या आणखी वाढली असेल. आजवर सर्वाधिक विकल्या गेलेल्या गेम्समध्ये माइनक्राफ्ट नंतर GTA V चा नंबर लागतो!
GTA V मोफत कशी डाउनलोड करायची ?
- ही गेम मोफत मिळवण्यासाठी प्रथम तुम्हाला Epic Games च्या वेबसाईटवरून Epic Games Store Launcher डाउनलोड करून इंस्टॉल करायचा आहे.
- इंस्टॉल करून उघडल्यावर तुम्हाला तुमचं अकाऊंट तयार करावं लागेल.
- अकाऊंट तयार करून सर्व प्रक्रिया पूर्ण झाली की Home वर असताना खाली स्क्रोल करत जा तुम्हाला Mystery Game / Free Games असा विभाग दिसेल
- या विभागात असताना GTA V चं पोस्टर दिसेल त्यावर क्लिक करून Get क्लिक करा
- आता ऑर्डर डिटेल्स दिसतील इथे टिक करून Place Order वर क्लिक करा
- ही गेम आता तुमच्या एपिक अकाऊंट गेम लायब्ररीमध्ये जोडली गेलेली असेल…!
ही गेम लायब्ररीमध्ये अॅड केली की लगेच डाउनलोड करण्याची गरज नाही. एकदा का ही गेम लायब्ररीमध्ये अॅड झाली की पुन्हा ती तुमच्यासाठी कायम फ्री उपलब्ध राहणार आहे आणि तुम्ही ती नंतर कधीही डाउनलोड करू शकाल.
आता लॉकडाऊन मुळे आधीच इंटरनेट स्लो झालं आहे आणि वरून ह्या गेमची डाउनलोड साईज खूपच मोठी आहे. ही गेम घेताना काही गोष्टी लक्षात घ्या त्या म्हणजे ही खूप मोठी गेम आहे त्यामुळे इंटरनेट अनलिमिटेड असल्याशिवाय डाउनलोड करायला जाऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे खाली दिलेल्या माहितीनुसार तुमचा लॅपटॉप/पीसी ही गेम चालवू शकेल का हे आधीच तपासून घ्या आणि मग डाउनलोड सुरू करा. ही गेम तुमच्या गेम लायब्ररीमध्ये जोडण्यासाठी ही ऑफर १४ मे पासून २१ मेच्या ८.३० पर्यंत वेळ आहे. लायब्ररीमध्ये अॅड केल्यावर गेम डाउनलोड तुम्ही कधीही करू शकाल.
Minimum System Requirements:
- OS: Windows 8.1 64 Bit, Windows 8 64 Bit, Windows 7 64 Bit Service Pack 1
- Processor: Intel Core 2 Quad CPU Q6600 @ 2.40GHz (4 CPUs) / AMD Phenom 9850 Quad-Core Processor (4 CPUs) @ 2.5GHz
- Memory: 4GB
- Video Card: NVIDIA 9800 GT 1GB / AMD HD 4870 1GB (DX 10, 10.1, 11)
- Sound Card: 100% DirectX 10 compatible
- HDD Space: 65GB
Recommended System Requirements:
- OS: Windows 8.1 64 Bit, Windows 8 64 Bit, Windows 7 64 Bit Service Pack 1
- Processor: Intel Core i5 3470 @ 3.2GHZ (4 CPUs) / AMD X8 FX-8350 @ 4GHZ (8 CPUs)
- Memory: 8GB
- Video Card: NVIDIA GTX 660 2GB / AMD HD7870 2GB
- Sound Card: 100% DirectX 10 compatible
- HDD Space: 65GB
ही गेम मोफत उपलब्ध करून देण्यासोबत आणखी in-game गोष्टीसुद्धा देण्यात आल्या आहेत त्याबद्दल असं सांगितलेलं दिसतं : The $1,000,000 bonus cash in GTA Online included with the Premium Edition as part of the Criminal Enterprise Starter Pack may take up to 7-10 days after the player’s first session in GTA Online to be reflected in their in-game User Account. This bonus cash is only available to first-time Starter Pack owners.
Search Terms : How to download GTA V for Free Grand Theft Auto 5 available free today on the Epic Games Store