गूगलने सध्याच्या काळात वाढत चाललेली व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सेवांची मागणी लक्षात घेऊन त्यांची Google Meet ही सेवा आता सर्वांसाठी मोफत उपलब्ध करून देत असल्याचं जाहीर केलं आहे. सध्या गूगल ड्युओ हे अॅप, गूगल हॅंगआउट आणि गूगल मीट असे तीन पर्याय गूगलकडून देण्यात येतात. यामधील गूगल मीट ही सेवा फक्त बिझनेस यूजर्ससाठी होती आणि यासाठी पैसे मोजायला लागत होते मात्र आता इतर अॅप्सची लोकप्रियता पाहून गूगलने गूगल मीटसुद्धा मोफत दिलं आहे. ही मोफत उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरु झाली असून येत्या काही दिवसात सर्वांना ही सेवा मोफत वापरता येईल.
गूगल मीट सेवा वापरण्यासाठी तुम्ही meet.google.com वर जाऊ शकता किंवा त्यांचं अँड्रॉइड व iOS अॅप वापरु शकता. गूगल मीट वापरण्यासाठी गूगल अकाऊंट असणं गरजेचं आहे. तुम्ही जीमेल साठी तयार केलेलं अकाऊंट जीमेल, यूट्यूब, प्ले स्टोअर, डॉक्स, ड्राइव्ह अशा सर्व गूगल सेवांमध्ये वापरू शकता.
झुमची लोकप्रियता सध्या शिखरावर असली तरी सुरक्षेबाबत अजूनही अनेक प्रश्न आहेत. गूगल मीट हा त्यावर चांगला मोफत पर्याय ठरू शकेल. गूगल मीटमध्येही एकावेळी १०० लोक सहभागी होऊ शकतात.
https://landing.google.com/googlemeet/ वर जाऊन तुम्ही नवी सेवा तुमच्यासाठी कधी उपलब्ध होईल याची नोटिफिकेशन मिळवू शकाल. .
अपडेट : 05-05-2020 आज ही सेवा सर्वांसाठी उपलब्ध झाल्याचं दिसत आहे.
Search Terms : Google Meet video confrencing service now available for free to everyone!