सोनी PS5 साठी नवा कंट्रोलर जाहीर : पुन्हा एक्सबॉक्स vs प्लेस्टेशन?

सोनीने काल त्यांच्या लवकरच येणाऱ्या Sony PlayStation 5 या गेम कॉन्सोलसाठी नवा ड्युयलसेन्स (DualSense) नावाचा कंट्रोलर जाहीर केला आहे. यामध्ये अनेक नव्या सुविधा जोडण्यात आल्या आहेत ज्याला नव्या डिझाईनची जोड देण्यात आली आहे. डिझाईन बदललं असलं तरी DualShock 4 मधील गेमर्सच्या आवडीच्या सोयी यामध्येही उपलब्ध असतील. नव्या कंट्रोलरला USB-C पोर्ट देण्यात आलं आहे ज्याद्वारे चार्जिंग करता येईल. इंटर्नल माइक सुद्धा आहे ज्याद्वारे गेमिंगवेळी चॅट करू शकाल. Haptic Feedback And Adaptive Triggers द्वारे गेम्स खेळताना आता आणखी मजा येणार आहे कारण यामुळे नक्कीच अधिक सुधारित अनुभव मिळेल.

Sony DualSense PS5 Controller मधील नव्या सुविधा!

गेमिंग विश्वात मायक्रोसॉफ्टचा Xbox आणि सोनीचा PlayStation गेम कॉन्सोलची मोठी स्पर्धा असते. दोन्हीही कॉन्सोलच्या पुढील आवृत्ती येत्या काही महिन्यात उपलब्ध होत आहेत. Xbox Series X आणि PlayStation 5 दोन्ही कॉन्सोल सध्या त्यांच्या ग्राहकांना म्हणजेच गेमर्सना आकर्षित करण्यासाठी अधून मधून नव्या फीचर्सची घोषणा करत आहेत. आलेला नवा कॉन्सोल बाजारात ५-६ वर्षांसाठी राहणार असल्याने भविष्यातील ट्रेंडसचा विचार करून त्यांना विविध सोईचा समावेश करावा लागतो. 120 fps support, 8K resolutions, Ray-tracing technology यावर सध्या तरी यांचा भर दिसून येत आहे. एक्सबॉक्सने त्यांच्या कॉन्सोलचंसुद्धा डिझाईन जाहीर केलं आहे मात्र सोनीनी अद्याप फक्त कंट्रोलरच जाहीर केला आहे.

अनेकांना माहीत नसेल की गेल्यावर्षीच सोनी व मायक्रोसॉफ्ट यांच्यामध्ये क्लाऊड सेवांसाठी करार झाला आहे आणि इथून पुढे सोनी मायक्रोसॉफ्टच्या क्लाऊड सेवांचा वापर करणार आहे!

Exit mobile version