मायक्रोसॉफ्टने काल जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांच्या ट्रान्सलेटर सेवेमध्ये आता मराठीसह ५ नव्या भाषा (गुजराती, कन्नड, मल्याळम, पंजाबी) उपलब्ध झाल्या आहेत. या भाषा Bing Translator, Microsoft Office 365, SwiftKey Keyboard, Bing & Microsoft Translator App on Android & iOS आणि लवकरच मायक्रोसॉफ्ट एज ब्राऊजर अशा जवळपास सर्व प्रमुख मायक्रोसॉफ्ट सेवांमध्ये जोडण्यात आल्या आहेत. आता दहा भारतीय भाषांमध्ये या सेवा उपलब्ध असतील. मायक्रोसॉफ्ट ट्रान्सलेटर केवळ टेक्स्ट किंवा आवाजातूनच नव्हे तर फोटोमधील मजकूर सुद्धा भाषांतरित करू शकेल. या सेवेला कृत्रिम बुद्धीमत्ते(AI)चीही जोड देण्यात आली आहे. नव्या भाषा अझ्युर (Azure)च्या API द्वारे मशीन लर्निंग व AI algorithms बिझनेस यूजर्ससाठीही देण्यात आल्या आहेत!
गूगल ट्रान्सलेटमध्ये मराठी भाषा जोडण्यात आल्या नंतर मायक्रोसॉफ्टनेही त्यांच्या सेवा मराठीत द्याव्यात अशी मागणी होत होती ती आता अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पूर्ण होत आहे. अनेक प्रसिद्ध वेबसाईट जसे की फेसबुक, ट्विटर बिंग ट्रान्सलेटर वापरायच्या मात्र यामध्ये मराठी नसल्याने त्या सरळ मराठीला हिंदी समजून भाषांतर करायच्या. आता असं चित्र दिसणार नाही.
कोरोना/COVID-19 च्या सध्याच्या परिस्थिती अनेक जण घरून काम करत आहेत अशावेळी जगभरात संपर्क साधण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ही ट्रान्सलेटर सेवा अधिक लोकांपर्यंत पोहचवत आहे.
मायक्रोसॉफ्ट आता न्यूरल इंजिन्स, मशीन लर्निंग व AI यांची मदत घेत भाषांतर सेवा शक्य तितकी अचूक करण्याच्या प्रयत्नात आहे. भारतातील प्रत्येकाकडे AI ची ताकद देण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. मायक्रोसॉफ्ट भारतीय भाषांचं वैविध्य साजरं करत असून अधिकाधिक लोकांना इंटरनेटसोबत जोडण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. गेली दोन दशके मायक्रोसॉफ्ट भारतीय भाषांना संगणकीय विश्वात सपोर्ट देत आहे असं सुंदर श्रीनिवासन (जनरल मॅनेजर, मायक्रोसॉफ्ट इंडिया) यांनी सांगितलं आहे.
मराठी भाषेबद्दल मायक्रोसॉफ्ट : Details about these languages : Marathi (pronounced məˈrati) is an Indo-Aryan language spoken by approximately 83 million people in the Indian state of Maharashtra. The language has some of the oldest literature of all modern Indian languages, dating from around 600 AD, written in Devanagari script. The release of this languages happens to coincide closely with formation day of the state of Maharashtra, which is the 1st of May.
मायक्रोसॉफ्ट ट्रान्सलेटर : ही सेवा एकमेकांची संवाद साधत असताना लाईव्ह भाषांतर करण्यासाठी आहे. (translator.microsoft.com)
बिंग ट्रान्सलेटर : ही सेवा नेहमीप्रमाणे टाइप केलेला मजकूर, आवाज, वेब पेजेस भाषांतरित करण्यासाठी आहे. (bing.com/translator)
Search Terms : Microsoft translator now available in Marathi alongwith Gujarati, Punjabi, Malayalam, Kannada, Bengali, Urdu,