गूगल मॅप्स आता दाखवेल अन्न व निवाऱ्यासाठी उपलब्ध जागा!

गूगलने काल जाहीर केलेल्या माहितीनुसार करोना/COVID-19 मुळे अनेक स्थलांतरितांना किंवा विस्थापित झालेल्या लोकांना आता अन्न आणि निवाऱ्यासाठी विविध ठिकाणी उपलब्ध करून दिलेली जवळची केंद्र स्थाने गूगल मॅप्सवर पाहता येतील. याबाबत गूगल केंद्र व राज्य सरकारांसोबत काम करत असून मदत केंद्राची माहिती सहज उपलब्ध करण्याचा एक प्रयत्न आहे.

काल पर्यंत भारतातील ३० शहरांमधील अशी ठिकाणे गूगल मॅप्स, सर्च आणि गूगल असिस्टंटद्वारे जाणून घेता येतील. यूजर्स ‘Food shelters in Pune’ किंवा ‘Night shelters in Mumbai’ अशा प्रकारे सर्च करून ही माहिती मिळवू शकतात.

ही सेवा लवकरच भारतीय भाषांमध्येही आणली जाणार आहे. अशा कठीण काळात टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही समस्यांवर उपाय काढण्याच्या प्रयत्नात आहोत असं गूगलतर्फे सांगण्यात आलं आहे. या सेवेमुळे गरज असणाऱ्या व्यक्तींना सरकारतर्फे पुरवला जाणारा अन्न व निवारा उपलब्ध होईल. स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था आणि वाहतूक कर्मचारी यांच्या मदतीने आम्ही ही महत्वपूर्ण माहिती गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नात आहोत. कारण यापैकी अनेकांकडे मोबाइल फोन्स नाहीत. त्यामुळे अशा मदत उपलब्ध करून देऊ शकणाऱ्या व्यक्तीकडून योग्य त्या ठिकाणी पोचता येईल इतकी तरी व्यवस्था याद्वारे नक्कीच होऊ शकेल.

https://twitter.com/GoogleIndia/status/1247125758947934209
Exit mobile version