गूगल ड्युओ (Google Duo) या गूगलच्या व्हिडिओ चॅट अॅपमध्ये आता एकाचवेळी बारा लोकांसोबत व्हिडिओ कॉल करता येणार आहे! तुलना करावयाची झाल्यास अॅपल फेसटाइमवर ३२, व्हॉट्सअॅपवर ४, स्काईपवर ५०, फेसबुक मेसेंजरवर ५०, झुमवर १०० लोकांशी एकाच वेळेस व्हिडिओद्वारे संभाषण करता येतं! गूगल ड्युओची ही नवी सोय अँड्रॉइड, iOS दोन्हीसाठी उपलब्ध आहे.
Google Duo : https://duo.google.com/
गूगलने अजूनही ही ग्रुप कॉलिंग सेवा तूर्तास फोन्सपुरतीच मर्यादित ठेवली आहे. गूगल ड्युओच्या वेबसाइटद्वारे ब्राऊजरवरून ग्रुप कॉल्स करता येणार नाहीत. त्यासाठी त्यांचीच हॅंगआऊट्स (hangouts.google.com) नावाची सुविधा वापरता येईल.
ड्युओमधील विशेष सुविधा म्हणजे ज्यावेळी समोरची व्यक्ती व्हिडिओ कॉल उचलत नाही त्यावेळी व्हिडिओ मेसेजेस पाठवता येतील. Knock Knock नावाच्या सोयीद्वारे व्हिडिओ कॉल उचलण्याच्या आधी प्रीव्यू दिसेल ज्यामुळे आपल्याला कॉल करत असलेली व्यक्ती कुठे आहे/कोणत्या कारणासाठी कॉल करत आहे याचा आधीच अंदाज येईल. गूगल ड्युओवरील कॉल्स end-to-end encryption ने सुरक्षित केलेले आहेत. नव्या अपडेटमध्ये हे व्हिडिओ मेसेज कस्टमाईझ करता येतील. त्यांच्या चित्र काढता येईल, शब्द व इमोजीसुद्धा लिहिता येतील!
सध्या वापरण्यास सोपं आणि उत्तम गुणवत्ता असलेलं असं अॅप म्हणून गूगल ड्युओचा पर्याय निवडता येईल. व्हॉट्सअॅपचा पर्याय आहे मात्र व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल्सची गुणवत्ता तितकी चांगली नाही आणि ग्रुप कॉलसाठी केवळ ४ जणांना सहभागी होता येतं… गूगल ड्युओसुद्धा फोन नंबर आधारितच आहे त्यामुळं फक्त अॅप घेतलं की लगेच वापरायला सुरुवात करता येते.
- ग्रुप कॉल सुरू करण्यासाठी Create Group नावाचा पर्याय निवडा
- सहभागी करावयाचे सदस्य निवडा जर कोणी वापरत नसेल तर त्यांना Invite Friends पर्याय वापरुन बोलावू शकता.
- आता Name This Group मध्ये ग्रुपचं नाव टाका
- यानंतर Start वर टॅप केलं की सर्व सदस्यांना रिंग जाईल आणि जे सदस्य कॉल उचलतील त्यांचा चेहरा दिसू लागेल.
Download Google Duo on Google Play
Download Google Duo on App Store
- व्हिडिओ कॉन्फरन्स अॅप्सचे ६.२ कोटी डाउनलोड्स : यूजर्समध्ये ७०% वाढ! : https://bit.ly/2QZ8xV7