जिओतर्फे करोना लक्षणं तपासणी टुल : माहितीपर वेबसाइट, सुविधा सादर!

करोना व्हायरस बाधित लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे . अशा वेळी लोकांना माहिती देण्यासाठी जिओ मायक्रोसॉफ्टसोबत भागीदारी करत पुढे आली आहे! Jio Together या अॅप व वेबसाइटद्वारे यूजर्सना करोना व्हायरसवर विविध प्रकारचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. #CoronaHaaregaIndiaJeetega (करोना हरेल भारत जिंकेल) असा हॅशटॅगसुद्धा सुरू करण्यात आला आहे.

Symptom Checker टूल द्वारे यूजर्सना काही प्रश्न विचारण्यात येतील ज्यावरून तुम्ही करोना व्हायरसने बाधित आहात का याची चाचणी केली पाहिजे का हे सुचवलं जाईल. सध्या अनेक लोक साध्या तापासाठीसुद्धा थेट करोना चाचणीची मागणी करत आहेत त्यामुळे वैद्यकीय सेवांवर विनाकारण ताण पडत आहे. अशावेळी आपण लक्षणं पाहून त्यानुसार निर्णय घेऊ शकता.
हे टूल अँड्रॉइड, iOS व जिओच्या वेबसाइटवरही उपलब्ध आहे. MyJio अॅप उघडून Jio Together नावाचा पर्याय निवडा. आता तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. त्यांची योग्य उत्तरे द्या. उदा. सर्दी, खोकला, थंडी, ताप काही असेल तर त्याची माहिती द्या. त्यानुसार एक रिपोर्ट तयार होऊन दिसेल. यामध्ये तुम्ही करोना व्हायरससाठी टेस्ट करायला हवी का नको ते सुचवलं जाईल.

आता आम्ही असं सांगत नाहीये की या रिपोर्टवर १००% विश्वास ठेऊन अजिबातच टेस्ट करू नका पण काही जणांच्या मनात गरज नसताना निर्माण झालेली भीती किंवा शंका यामुळे दूर होतील आणि पर्यायाने वैद्यकीय सेवांवरील ताण काही प्रमाणात कमी होईल

Jio Corona Symptoms Checker : https://covid.bhaarat.ai/आणि jio.com/jiotogether

या लक्षणं तपासण्याच्या टूल सोबत जिओने माहितीपर अनेक गोष्टी जोडल्या आहेत. जर लक्षणं दिसत असतील तर काय करायला हवं, मदत कुठे मिळू शकेल, इ. यामध्ये आणखी एक विभाग असा आहे जो भारतात एकूण किती रुग्ण आहेत यामुळे किती जणांचा मृत्यू झाला किती जण बरे झाले हे सुद्धा दाखवलं जाईल. टेस्टिंग सेंटर्सच्या फोन नंबर्सचीही माहिती यामध्ये आहे.

Jio Together साठी जिओने मायक्रोसॉफ्टसोबत भागीदारी केली असून बऱ्याच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगण्यात आलं आहे. त्यासाठी त्यांची Microsoft Teams नावाची सेवा उपयोगी पडेल.

जिओच्या होम ब्रॉडब्रॅंडची सेवा 10Mbps इंटरनेट स्पीडसह कोणत्याही प्रकारचे अधिक पैसे न देता मिळेल! शिवाय सर्व प्लॅन्सवर दुप्पट डेटा पुरवला जाईल!

जिओ प्रिपेड प्लॅन्सवरही काही ऑफर्स आल्या असून अॅड ऑन पॅक म्हणजे तुम्ही मूळ पॅक वर जोडला जाणाऱ्या पॅकमध्ये आता दुप्पट डेटा मिळेल!

करोना व्हायरसबद्दल अधिकृत माहितीसाठी काही पर्याय

Exit mobile version