फेसबुकची डेस्कटॉप वेबसाईट आता नव्या रूपात डार्क मोडसह!

गेली कित्येक वर्षं बऱ्यापैकी सारख्याच प्रकारचं डिझाईन असणाऱ्या फेसबुकने आता नव्या रूपात आपली वेबसाइट सादर केली आहे. यासोबत त्यांनी आता डेस्कटॉप वेबसाइटवर सुद्धा डार्क मोड आणला आहे. नव्या डिझाईनमध्ये डार्क मोड, वाढलेला वेग, गोष्टी पाहण्यासाठी सोपं सुटसुटीत डिझाईन आणत आहोत आणि त्यासाठी आम्हाला तुमचा अभिप्राय हवा आहे असं फेसबुकतर्फे सांगण्यात येत आहे. नवं डिझाईन सरसकट सर्वांना लागू करण्यात आलेलं नाही मात्र जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आता लगेच ते वापरुन पाहू शकता.

अपडेट 11-05-2020 : फेसबुक डेस्कटॉप वेबसाइटवरील डार्क मोड आणि नवं डिझाईन आता सर्वांसाठी उपलब्ध झालं आहे.

How to get new Facebook Design and Dark mode on Desktop Website 2020?

उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या उलट्या बाणावर (🔽) क्लिक करा आणि समोर आलेल्या पर्यायात Switch to New Facebook हा नवा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि काही सेकंदात नव्या रुपातलं फेसबुक लोड झालेलं दिसेल. तुम्हाला डार्क मोड हवा असेल तर पुन्हा त्या कोपऱ्यातल्या बाणावर क्लिक करा आणि Dark Mode डार्क मोड स्विच उजवीकडे सरकवा डार्क मोड सुरू झालेला दिसेल!

माराठीटेकचं फेसबुक पेज नव्या डिझाईनमध्ये असं दिसेल!

गेले अनेक दिवस याची चाचणी सुरू होती. अजूनही यामध्ये सर्व पर्याय नव्या रूपात दिसत नाहीत. काही पर्यायांसमोर तसं सांगितलं जात आहे. सध्यातरी हा नवा लूक पूर्ण वेबसाइटवर लावण्यात आलेला नाही. यूजर्सना तसा जुन्या डिझाईनकडे परत जाण्याचाही पर्याय ठेवण्यात आला आहे. जो आपण परत कधीही वापरुन नवं किंवा जुनं डिझाईन कधीही बदलून वापरू शकता.

फेसबुकने याआआधी इंस्टाग्राम, फेसबुक अॅप, व्हॉट्सअॅप या त्यांच्या सेवांमध्ये डार्क मोड उपलब्ध करून दिलेला आहे. आता सर्व प्रमुख वेबसाइट्स व अॅप्सवर डार्क मोड उपलब्ध असून याचा वापर नक्की करा जेणेकरून तुमच्या डोळ्यांना होणारा त्रास किंवा त्यांवर पडणारा ताण कमी होईल आणि बॅटरी सुद्धा वाचेल!

Exit mobile version