Vu प्रीमियम टीव्ही मालिका भारतात उपलब्ध : १०९९९ पासून सुरू!

Vu (व्ह्यू) टेलिव्हीजन्स कंपनीने नवनवीन तंत्रज्ञान असलेले टीव्ही स्वस्त दरात उपलब्ध करून देऊन भारतीय टीव्ही क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. या कंपनीची सुरुवात कॅलिफोर्निया, अमेरिका येथून झाली आहे. फ्लिपकार्टद्वारे विक्री होत असलेले हे टीव्ही कमी किंमत आणि उत्तम डिस्प्ले यामुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. शिवाय या टीव्हीमध्ये गूगलच्या अँड्रॉइड टीव्ही ओएसचा अधिकृत सपोर्ट असल्यामुळे सॉफ्टवेअरसुद्धा चांगलं आहे. त्यांनी आता आपलं स्थान आणखी बळकट करण्यासाठी Vu Premium TV भारतात सादर केले असून हे स्मार्ट टीव्ही ३२ इंची १०९९९ आणि ४३ इंची १९९९९ अशा किंमतीत उपलब्ध असतील असं Vu कंपनीच्या प्रमुख देविता सराफ यांनी माध्यमांसमोर सांगितलं आहे.

Vu Premium TV 32-inch मध्ये 1366×768 HD रेजोल्यूशन आहे तर 43 इंची मॉडेलमध्ये 1920×1080 FullHD रेजोल्यूशन देण्यात आलं आहे. दोन्ही टीव्हीमध्ये A+ गुणवत्ता असलेले पॅनल्स आहेत ज्यामुळे सर्व ठिकाणी समान ब्राइटनेस पाहायला मिळेल असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. टीव्हीचा रिस्पॉन्स टाइम 8ms आणि viewing angle 178 अंश आहे.

Buy Vu Premium TV on Flipkart लिंक : http://fkrt.it/PCuMm6uuuN

दोन्ही टीव्ही Dolby Audio आणि DTS Surround Sound सह उत्कृष्ट ऑडिओ अनुभव देतील. ३२ इंची मॉडेलमध्ये 20W स्पीकर आहे तर ४३ इंची मध्ये 24W चा स्पीकर मिळेल. सोबत यामध्ये पिक्चर मोड देण्यात आले आहेत. उदा क्रिकेट मोड जो एकंदरीत सामने पाहण्याचा अनुभव अधिक चांगला बनवेल.

Vu च्या या टीव्ही मालिकेत गूगलच्या अँड्रॉइड 9.0 पाय टीव्ही ओएसचा अधिकृत सपोर्ट देण्यात आला आहे. सोबत गूगल प्ले स्टोअर, गेम्स, मूवी आणि नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार यूट्यूब हे सुद्धा उपलब्ध आहेत. क्रोमकास्ट सपोर्ट सुध्दा आहे ज्याद्वारे तुमच्या फोनची स्क्रीन आहे अशी टीव्हीवर पाहू शकता. रिमोट या सेवांसाठी खास बटणे देण्यात आली आहेत.
या टीव्ही 64bit प्रोसेसर देण्यात आला आहे ज्याला 1GB RAM आणि 8GB स्टोरेजची जोड दिलेली आहे. कनेक्टीविटीसाठी optical out, RF port, headphone port, two HDMI ports, two USB ports, LAN, Bluetooth and WiFi हे पर्याय आहेत.

सध्या कमी किंमतीत स्मार्टटीव्ही सादर करण्यासाठी अनेक ब्रॅंड्स पुढे येत असून अनेक मोबाइल कंपन्या देखील टीव्हीच्या बाजारात येत आहेत जसे की मोटोरोला, शायोमी, नोकीया, वनप्लस, मायक्रोमॅक्स, इ. आणि आता यांची स्पर्धा जुन्या सॅमसंग, सोनी व एलजी सारख्या तगडया स्पर्धकांशी आहे. वाढलेले डीटीएच दर पाहून अनेक ग्राहक ऑनलाइन स्ट्रीमिंगकडे वळत असून त्यासाठीच ही कंटेंट आधारित टीव्ही मालिका पुढे आणलि जात आहे.

Exit mobile version