गूगलच्या गूगल मॅप्स सेवेला आज १५ वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने गूगल मॅप्ससाठी आता नव्या लोगोचं अनावरण करण्यात आलं असून अॅपच्या डिझाईनमध्येसुद्धा बरेच बदल करण्यात आहेत. यासोबत काही नव्या सोयीसुद्धा यामध्ये जोडण्यात आल्या आहेत. गूगलने हे अपडेट नेहमीप्रमाणे यूजर्सना मॅप्समधील सेवा अधिक वेगाने व अचूक वापरता याव्यात या दृष्टीने हे बदल करण्यात आले आहेत. ८ फेब्रुवारी २००५ मध्ये सुरुवात झालेली ही सेवा आता जवळपास प्रत्येक स्मार्टफोन यूजरकडून वापरली जाते. इतर मॅपिंग सेवांसमोर गूगल मॅप्स नक्कीच खूप पुढे आहे.
नव्या अपडेटमध्ये नॅविगेशनवर अधिक भर देण्यात आला असून आता सेटिंग्समध्ये उपलब्ध असणारे काही महत्वाचे पर्याय अॅप उघडल्या उघडल्या खाली असलेल्या टॅबवरच पाहायला मिळतील. आता या खाली असलेल्या टॅबवर Explore, Commute, Saved, Contribute व Updates हे पर्याय पहायला मिळतील.
- Explore: या पर्यायात आपण जवळपास असलेल्या हॉटेल्स, कॅफे प्रेक्षणीय स्थळे यांची माहिती मिळवून रिव्यू पाहू शकाल
- Commute: यामध्ये तुम्ही तुम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे त्याबद्दल उपलब्ध मार्ग, लागणारा वेळ, इ माहिती मिळेल.
- Saved: यामध्ये तुम्ही स्वतः साठवलेली स्थळे जसे की हॉटेल्स, कॅफे, मित्र किंवा नातेवाईकांचे घर अशी आधी सेव्ह केलेली ठिकाणे पाहू शकाल. ही सेव्ह केलेलीयादी शेयर सुद्धा करता येईल.
- Contribute: याद्वारे तुम्ही गूगल मॅप्समध्ये नसलेली माहिती जोडू शकाल. रिव्यू, फोटो, एखाद्या ठिकाणाचा फोन क्रमांक अशी सर्व माहिती गूगलला सुचवू शकाल.
- Updates: तुम्ही आधी भेट दिलेली ठिकाणे आणि त्यावर आधारित तुम्हाला आवडतील अशी इतर ठिकाणे यांची माहिती इथे मिळेल. शिवाय तुमच्या भागात नवे हॉटेल किंवा प्रेक्षणीय स्थळ झालं असल्यास त्याचीसुद्धा माहिती मिळेल.
अधिक माहिती : Google Maps is turning 15! Celebrate with a new look and features
Search Terms : Google Maps Completes 15 years Logo and App Design Update