भारतीयांनी २०१९ मध्ये दररोज सरासरी ३.५ तास स्मार्टफोनचा वापर केला!

भारत अमेरिकेला मागे टाकून जगातली दुसऱ्या क्रमांकाची स्मार्टफोन बाजारपेठ बनला आहे!

भारतात आता स्मार्टफोन्स वापरण्याच प्रमाण प्रचंड वेगाने वाढलं आहे हे सर्वांना माहीत आहेच. पण अलीकडेच झालेल्या सर्वेमधील माहितीनुसार भारतीय स्मार्टफोन यूजर्स दिवसभरात तब्बल ३.५ तास त्यांच्या फोनचा वापर करतात! २०१७ सोबत तुलना करता २०१९ मध्ये हे प्रमाण २५ टक्क्यानी वाढलं आहे असं App Annie कंपनीच्या सर्वेमधील माहितीत सांगण्यात आलं आहे.

तरी भारतातील हे फोन वापरण्याच प्रमाण जगाच्या सरासरी पेक्षा थोडं कमीच आहे. जगभरात सरासरी ३ तास ४० मिनिटे स्मार्टफोन्स वापरले जातात. भारत, चीन, इंडोनेशिया, ब्राजील आणि दक्षिण कोरिया सारख्या विकसनशील देशात दररोज जवळपास ४ तास फोन वापरला जात आहे. दुसरीकडे प्रगत देश म्हणजे अमेरिका, जपान, रशिया, कॅनडा, फ्रान्स व जर्मनी सारख्या देशांमध्ये सरासरी वापर ३ तासांपेक्षाही कमी झालेला पाहायला मिळतोय!

वर दिलेल्या माहितीनुसार तुम्ही पाहू शकता की २०१७ पासून फोन्स वापरण्याच सर्वाधिक प्रमाण वाढलं आहे ते चीनमध्ये ते सुद्धा तब्बल ६० टक्क्यानी! काही जणांना या सर्वेमधील माहितीवर विश्वास बसणार नाही तर काही जण आम्ही साडेतीन तासांपेक्षा नक्कीच जास्त फोनचा वापर करतो असं मत नोंदवतील. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही फोन गरजेपेक्षा अधिक कालावधीसाठी वापरत आहात तर तुम्ही तुमच्या नव्या फोन्समध्ये जोडण्यात आलेल्या Digital Wellbeing नावाच्या सुविधेचा वापर करू शकता. ही सुविधा तुम्ही दरदिवशी कोणत्या अॅपवर किती वेळ घालवला आहे हे दाखवते.

भारत अलीकडेच अमेरिकेला मागे टाकून जगातली दुसऱ्या क्रमांकाची स्मार्टफोन बाजारपेठ बनला आहे. प्रथम स्थानी चीन आहे. मध्यम व कमी किंमतीच्या फोन्सची वाढत गेलेली विक्री यासाठी कारणीभूत ठरली आहे.

Exit mobile version