जिओ मार्ट : आता रिलायन्स जिओची ऑनलाइन शॉपिंग सेवा उपलब्ध!

रिलायन्स जिओ आता सर्वाना माहीत असलेलं नाव झालं आहे. स्वस्त 4G इंटरनेट सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे लाखो लोकांनी त्यांचे जुने ऑपरेटर्स सोडून जिओचा पर्याय स्वीकारला आहे. आता मोबाइल सेवानंतर त्यांनी इतर सेवा सुद्धा उपलब्ध करून दिल्या आहेत जसे की जिओ गिगाफायबर, ब्रॉडब्रॅंड, जिओ फोन, जिओफाय, जिओ टीव्हीसारखे अॅप्स, इ. सध्या जोमत असलेलं असं एकच क्षेत्र जिओसाठी राहिलं होतं ते म्हणजे इ कॉमर्स/ऑनलाइन शॉपिंग. काही महिन्यांपूर्वी याची पुसटशी कल्पना देण्यात आली होती. आता मात्र याची चाचणी सुरू होऊन ग्राहकांना जिओ मार्ट उपलब्ध झालं असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्यातरी काही मर्यादित ठिकाणीच जिओ मार्टच्या अॅपची सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र उपलब्ध सेवेच्या स्वरूपावरून ही सेवा फ्लिपकार्ट व अॅमेझॉनला चांगला पर्याय निर्माण करेल असं दिसत आहे.

JioMart Website

Jio Mart सेवा सध्या चाचणी दरम्यान नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण या तीनच शहरांत उपलब्ध करून दिली आहे. या जिओ मार्टद्वारे ३ कोटी ऑफलाइन विक्रेत्याना जोडून २० कोटी घरांसोबत जोडलं जाण्याचा रिलायन्सचा मानस आहे! JioMart रिलायन्स रिटेलच्या छायेत काम करणार असून रिलायन्स रिटेल ही सेवा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चा प्रमुख भाग आहे. सध्या रिलायन्स नोंदणी करून घेत असून ५०००० हून अधिक किराणा मालाच्या वस्तू घरपोच केल्या जातील तेही मोफत होम डिलिव्हरीसह! कमीतकमी खरेदीची मर्यादाही नाही. शिवाय वस्तु आवडली नाही तर रिटर्न करता येतील आणि तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही! या सेवेमुळे किमान किराणा/ग्रोसरी वस्तूंबाबत तरी फ्लिपकार्ट व अॅमेझॉनलासोबत लगोलग आव्हान उभं करू शकेल! Mint वेबसाइटच्या माहितीनुसार तर रिलायन्स जिओद्वारे काही यूजर्सना आमंत्रित केलं जात आहे आणि सुरुवातीच्या ग्राहकांना त्यांच्या JioMart अकाऊंटवर ३००० रुपये दिले जात आहेत!

https://www.jio.com/jiomart

JioMart द्वारे स्थानिक विक्रेत्याना ग्राहक मिळवून दिले जातील अशी माहिती देण्यात आली आहे! फ्लिपकार्ट व अॅमेझॉन आणि JioMart यांच्यात या बाबतीतच एक प्रमुख फरक राहणार आहे. या दोघांप्रमाणे स्वतःच वेयरहाऊस बांधण्यापेक्षा जिओमार्ट स्थानिक विक्रेत्याकडून वस्तु घेणार आहे. या पद्धतीला ऑनलाइन टू ऑनलाइन (O2O) असंही म्हटलं जातं. यामुळे स्थानिक विक्रेत्यांनाही फायदाच होणार असून त्यांच्या व्यवसायाला ऑनलाइन विक्रीमुळे होणारं नुकसान स्वतःच ऑनलाइन विक्री प्रक्रियेचा भाग झाल्यावर कमी होणार आहे.

जिओमार्टची सुरुवातीला थेट स्पर्धा Amazon Prime Now सोबत होईल. यासाठी जिओने CSquare या सॉफ्टवेअर कंपनीसोबत भागीदारी केली असून ही कंपनी इ कॉमर्स, विक्रेते यांना विविध सॉफ्टवेअर पर्याय उपलब्ध करून देते. शिवाय गेल्या वर्षीच Grab A Grub या कुरियर सेवेसंबंधित कंपनीचंही अधिग्रहण त्यांनी केलं आहे!

Search Terms : Reliance Jio JioMart E Commerce Online Shopping Website App Offers Grocery Products with Savings Upto 3000 at launch

Exit mobile version