आजवर दुसऱ्या व्यक्तीकडून आलेले ईमेल तिसऱ्या व्यक्तीला पाठवायचे असतील तर एक एक सिलेक्ट करून फॉरवर्ड करावा लागायचा. यामुळे हे काम वारंवार करावं लागणाऱ्या व्यक्तींना निश्चितच त्रास व्हायचा. पाठवल्यावर त्या तिसऱ्या व्यक्तीकडेही ते मेल एकत्र जात नसल्यामुळे जर दुसऱ्या व्यक्तीचे ईमेल्स येता येता आणखी कुठला मेल मध्येच अल की गोंधळ झालाच. शिवाय दोघांचाही विनाकारण वेळ जायचा तो वेगळाच…मात्र यावर गूगलने त्यांच्या Gmail सेवेमध्ये नवा पर्याय दिला असून याद्वारे आपण आपल्या इनबॉक्समधील अनेक ईमेल सिलेक्ट करून अटॅचमेंट स्वरूपात पाठवू शकतो!
‘तुम्ही आता जीमेलमध्ये दुसऱ्या ईमेल्सना ईमेल जोडू शकता’ असं गूगलनेच म्हटलं आहे! ही सुविधा आपण ड्रॅग अँड ड्रॉप पद्धतीनेसुद्धा वापरू शकतो! नेहमीच्या फाइल्स प्रमाणे अनेक ईमेल सिलेक्ट करू शकतो. Forward as attachment असा पर्याय दिलेला दिसेल. एकावेळी किती ईमेल्स अटॅच करता येतील याबद्दल कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. हे ईमेल्स .eml फॉरमॅटमध्ये अटॅच केले जातील. जे ईमेल स्वीकारणारा व्यक्ती पुन्हा स्वतंत्ररित्या पाहू शकेल.
ही सुविधा हळूहळू उपलब्ध करून दिली जात असून सर्वांसाठी पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला मिळालेली दिसेल असं सांगण्यात येत आहे. G Suite सभासदांना ही सुविधा आत्ताच देण्यात आलेली आहे.