DJI चा नवा Mavic Mini ड्रोन : तळहातावर मावणारा स्मार्ट ड्रोन!

डिजेआयने त्यांच्या ड्रोन मालिकेत आणखी एका लहान आकाराच्या ड्रोनची जोड दिली असून नवा ड्रोन Mavic Mini या नावाने ओळखला जाईल. याचा आकार तळहाताएव्हढाच असून वजनही कमी आहे. याची किंमत $399 (~२९०००) असणार आहे ज्यामध्ये ड्रोन, एक बॅटरी, एक कंट्रोलर आणि पात्यांची एक जोड मिळेल. आणखी एक Fly More पर्याय उपलब्ध असेल ज्याची किंमत $499 असेल त्यामध्ये ड्रोन, तीन बॅटरी, बॅटरी चार्जिंग हब, एक कॅरींग केस, एक कंट्रोलर आणि पात्यांची तीन जोडी मिळतील. यापूर्वी आलेल्या मॅविक एयरचा आकार आणि सोबत मोठ्या ड्रोनमधील सुविधा या मॅविक मिनीमध्ये पाहायला मिळतील.

किंमत कमी असूनही बऱ्याच मोठ्या ड्रोन्समध्ये पाहायला मिळणाऱ्या सोयी यामध्ये देण्यात आल्या आहेत. याचं वजन केवळ 249 ग्रॅम्स आहे. एका बॅटरी चार्जवर हा ड्रोन ३० मिनिटे उडवता येईल. या ड्रोनमध्ये 2.7K रेजोल्यूशनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करता येईल. याचा कॅमेरा सेन्सर 1/2.3 इंची असून 2.7K 30fps, 1080p 60fps व्हिडिओ आणि 12MP फोटो काढता येतील! शिवाय यामध्ये 3 axis गिंबल देण्यात आलं आहे ज्यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग स्थिर दिसेल!

मॅविक मिनी खास वैशिष्ट्ये :

MAVIC MINI

Takeoff Weight : 249 g
Max Flight Time : 30 minutes
Stabilization : 3-axis (tilt, roll, pan)
Sensor : 1/2.3” CMOS
Effective Pixels: 12 MP
Video Resolution : 2.7 K: 2720×1530 25/30 p
FHD: 1920×1080 25/30/50/60 p
Battery Capacity : 2600 mAh

Exit mobile version