Moto G8 Plus भारतात उपलब्ध : मध्यम किंमतीत नवा पर्याय!

काही वर्षांपूर्वी बऱ्यापैकी प्रसिद्ध झालेल्या मोटोरोलाने नंतर मात्र त्यांचं स्थान गमावलेलं दिसत आहे. नव्याने पुन्हा ते स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात ते आता त्यांच्या लोकप्रिय Moto G मालिकेत नवे फोन्स सादर करत आहेत. आता त्यांचा Moto G8 Plus भारतात सादर झाला असून या फोनची किंमत १३९९९ असणार आहे. हा फोन ऑक्टोबरच्या शेवटी फ्लिपकार्टवर उपलब्ध होत आहे.

या फोनमध्ये 6.3″ डिस्प्ले असून क्वालकॉमचा Snapdragon 665 प्रॉसेसर देण्यात आला आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आलं आहे जे मेमरी कार्डद्वारे 512GB पर्यंत वाढवता येईल. 4000mAh बॅटरी सोबत 15W टर्बो चार्जिंग देण्यात आलं आहे. या फोनचं डिझाईन water-repellent असून यामुळे थोड्या पावसात सुद्धा हा फोन वापरला तरी चालू शकेल! स्पीकर्ससाठी डॉल्बी ऑडिओची जोड दिलेली आहे. कॅमेरासाठी Quad Pixel cameras देण्यात आले असून मुख्य कॅमेरा 48MP आहे. वाईड अॅंगलसाठी 16MP कॅमेरा असून त्याला मोटोने अॅक्शन कॅम म्हटलं आहे!

मोटोच्या या फोन आणि किंमती व एकंदर सुविधा पाहता या फोनलाही फारसं यश मिळणार नाही असंच दिसत आहे. Redmi Note 8 Pro, Samsung M30s, Realme 5 Pro सारखे उत्तम पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहेत.

Moto G8 Plus

डिस्प्ले : 6.3” U notch, 400 ppi FHD+ 19:9 Max Vision display
प्रोसेसर : Qualcomm Snapdragon 665
GPU : Adreno 610
रॅम : 4GB
स्टोरेज : 64GB with microSD card support (up to 512 GB)
कॅमेरा : 48 MP main sensor (f/2.0,
फ्रंट कॅमेरा : 25 MP (f/2.0, Quad Pixel technology) + 5 MP depth sensor + 16 MP sensor Action Cam Wide Angle Sensor
बॅटरी : 4000mAh 15W Turbo Charging
ऑपरेटिंग सिस्टिम : Android™ 9 Pie
इतर : Stereo speakers with smart PA, Dolby Audio, NFC, USB-C, Water repellent design, Fingerprint reader
सेन्सर्स : Fingerprint reader, Proximity, Accelerometer, Ambient light, Sensor hub, Gyroscope, Ultrasonic, E-compass.
रंग : Cosmic Blue, Crystal Pink
किंमत :
4GB+64GB ₹१३९९९

https://youtu.be/ojsaI8tx69c
Exit mobile version