सॅमसंग Galaxy M30s व M10s सादर : तब्बल 6000mAh बॅटरी, sAMOLED डिस्प्ले!

सॅमसंगने मध्यम किंमतीच्या फोन्सच्या बाजारात पुन्हा एकदा बस्तान बसवायला सुरुवात केल्याच चित्र दिसत असून आता यासाठीच त्यांनी आणखी दोन पर्याय उपलब्ध करून देत असून नवे फोन त्यांच्या सध्या गाजत असलेल्या M सिरिज फोनमध्ये सादर झाले आहेत. Samsung Galaxy M30s आणि Galaxy M10s हे आज बऱ्याच दिवसांच्या जाहिरातीनंतर सादर झाले आहेत. Galaxy M30s मध्ये देण्यात आलेल्या 6000mAh च्या मोठ्या बॅटरीची चर्चा आहे. सॅमसंगने प्रथमच एव्हढी मोठी बॅटरी फोनमध्ये जोडली आहे! दोन्ही फोन भारतात २९ सप्टेंबरपासून अॅमेझॉनवर उपलब्ध होत आहेत. या दिवशी अॅमेझॉनचा ग्रेट इंडियन सेल सुरू होणार आहे.

Samsung Galaxy M30s

डिस्प्ले : 6.4” FHD+ sAMOLED Infinity U
प्रोसेसर : Exynos 9611
ऑपरेटिंग सिस्टम : Android Pie Samsung One UI
कॅमेरा : 48MP+8MP+5MP
फ्रंट कॅमेरा : 16MP
रॅम : 4GB/6GB
स्टोरेज : 64GB/128GB
बॅटरी : 6,000mAh 15W Fast charging USB Type C
सेन्सर्स : Accelerometer, Fingerprint Sensor, Gyro Sensor, Geomagnetic Sensor, Hall Sensor, Light Sensor, Proximity Sensor
रंग : Opal Black, Sapphire Blue and Pearl White
किंमत :
₹१३९९९ (4GB+64GB )
₹१६९९९ (6GB+128GB )

Samsung Galaxy M10s

डिस्प्ले : 6.4” HD+ sAMOLED Infinity V
प्रोसेसर : Exynos 9611
ऑपरेटिंग सिस्टम : Android Pie Samsung One UI
कॅमेरा : 13MP+5MP
फ्रंट कॅमेरा : 8MP
रॅम : 3GB
स्टोरेज : 32GB
बॅटरी : 4000mAh 15W Fast charging USB Type C
सेन्सर्स : Accelerometer, Fingerprint Sensor, Gyro Sensor, Geomagnetic Sensor, Hall Sensor, Light Sensor, Proximity Sensor
रंग : Stone Blue and Piano Black
किंमत :
₹८९९९ (3GB+32GB )

Exit mobile version