अॅपल आयफोन ११ सादर : iPhone 11, 11 Pro, 11 Pro Max!

अॅपलने काल झालेल्या अॅपल इव्हेंटमध्ये बऱ्याच नव्या उत्पादनांची घोषणा के असून या सर्वांचं प्रमुख आकर्षण असणाऱ्या अॅपल आयफोनचे तीन नवे मॉडेल्स आज सादर करण्यात आले आहेत. iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max हे तीन नवे आयफोन्स आज जगासमोर आणले गेले आहेत. या फोन्समध्ये आता नवा प्रोसेसर जोडण्यात येणार असून सध्याच्या सर्व मोबाइल प्रोसेसर्सना बऱ्याच अंतराने मागे टाकत A13 Bionic चीप आता आयफोन्सवर उपलब्ध असेल. यामध्ये जगातला आजवरचा सर्वोत्तम कामगिरी करणारा, सर्वात वेगवान CPU व GPU असेल! iOS 13.1 ३० सप्टेंबरपासून उपलब्ध होत असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं आहे. यासोबत अॅपल आयपॅड 7th Gen 10.2″, अॅपल वॉच सिरिज ५, अॅपल टीव्ही +, अॅपल आर्केड यांच्याबद्दलही अधिक माहिती जाहीर करण्यात आली आहे.

आयफोन ११ प्रो व ११ प्रो मॅक्समध्ये प्रथमच तीन कॅमेरांचा वापर करण्यात आला आहे. 11 Pro Max मध्ये तिन्ही कॅमेरा 12MP असून Ultra Wide, Wide आणि Telephoto असे तिन्ही प्रकारचे कॅमेरे आता उपलब्ध असतील. Deep Fusion तंत्राद्वारे एकावेळी ९ फोटो काढून त्यामध्ये आपोआप वर्गीकरण करून सर्वाधिक पिक्सल्स मशीन लर्निंगचा वापर करून अंतिम फोटो साठवला जाईल त्यामध्ये झूम केल्यावरही उत्कृष्ट स्पष्टता दिसेल! सोबत आयफोनमध्ये आता नाइट मोड देण्यात आला आहे जो अतिशय कमी प्रकाशात सुद्धा उत्तम फोटो काढून देईल!
11 Pro मध्ये 5.8″ तर 11 Pro Max मध्ये 6.5″ Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. 2688×1242 रेजोल्यूशन आणि 458ppi पिक्सल डेन्सिटी असेल.

नव्या आयफोन्सची किंमत पुढील प्रमाणे iPhone 11: ₹64,990 | iPhone 11 Pro: ₹99,900 | iPhone 11 Pro Max: ₹1,09,900

iPhone 11 Pro Max

डिस्प्ले : 6.5‑inch (diagonal) all‑screen OLED Super Retina XDR display 2688×1242 resolution at 458 ppi
प्रोसेसर : Apple A13 Bionic
GPU : –
रॅम : –
स्टोरेज : 64GB/256GB/512GB
कॅमेरा : Triple 12MP Ultra Wide, Wide, and Telephoto cameras (Ultra Wide: ƒ/2.4, Wide: ƒ/1.8, Telephoto: ƒ/2.0 aperture)
4K video recording at 24 fps, 30 fps, or 60 fps, Slo‑mo video support for 1080p at 120 fps or 240 fps
फ्रंट कॅमेरा : 12MP ƒ/2.2 aperture Portrait mode with advanced bokeh and Depth Control
4K video recording at 24 fps, 30 fps, or 60 fps
बॅटरी : 18W adapter included Up to 50% charge in around 30 minutes
ऑपरेटिंग सिस्टिम : iOS 13
सेन्सर्स : Face ID, Barometer, Three‑axis gyro, Accelerometer, Proximity sensor, Ambient light sensor
इतर : In-screen fingerprint sensor, Bluetooth 5.0, USB Type-C, Rated IP68, FaceID TrueDepth camera for facial recognition
रंग : Gold, Space Gray, Silver, Midnight Green
किंमत : ₹1,09,900

https://youtu.be/cVEemOmHw9Y
Exit mobile version